सेक्स रॅकेटचे भाजप कनेक्शन वनमंत्र्यांनी फेटाळून लावले, काँग्रेसच्या आरोपांवर दिले 'हे' स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 06:32 PM2022-01-09T18:32:08+5:302022-01-09T18:40:07+5:30

Sex Racket Connection : जर कोणी चुकीचे काम केले असेल तर कायद्यानुसार त्याला सजा झाली पाहिजे. आम्ही त्याला वाचवणार नाही. तुम्ही नियमांविरुद्ध काम करत असाल तर कायद्याला आपलं काम करू द्या. राजकीय संबंध असल्याने कोणीही जवळचे होत नाही.

BJP connections for sex racket rejected by Forest Minister, given explaination | सेक्स रॅकेटचे भाजप कनेक्शन वनमंत्र्यांनी फेटाळून लावले, काँग्रेसच्या आरोपांवर दिले 'हे' स्पष्टीकरण

सेक्स रॅकेटचे भाजप कनेक्शन वनमंत्र्यांनी फेटाळून लावले, काँग्रेसच्या आरोपांवर दिले 'हे' स्पष्टीकरण

googlenewsNext

इंदूरच्या सेक्स रॅकेटमध्ये पकडलेल्या तीन आरोपींचे भाजपशी कनेक्शन समोर आले आहे. काँग्रेसनेअटक केलेल्या आरोपींचे वनमंत्री विजय शहा यांच्यासोबतचे फोटो प्रसिद्ध केला आहे. या आरोपांवर मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, राजकीय संबंध ठेवल्याने कोणाला जवळ केले जात नाही. त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, आम्ही सार्वजनिक जीवनात काम करतो. जर कोणी तुमच्यासोबत फोटो काढत असेल तर तुम्ही नकार देऊ शकत नाही. जर कोणी चुकीचे काम केले असेल तर कायद्यानुसार त्याला सजा झाली पाहिजे. आम्ही त्याला वाचवणार नाही. तुम्ही नियमांविरुद्ध काम करत असाल तर कायद्याला आपलं काम करू द्या. राजकीय संबंध असल्याने कोणीही जवळचे होत नाही.

वनमंत्र्यांनी काँग्रेसचे आरोप फेटाळून लावले
राजकीय संबंध आपल्या स्थानी आणि वैयक्तिक संबंध त्याच्या स्थानी आहेत. ते पुढे म्हणाले की, मंत्री किंवा आमदारासोबत सेल्फी काढणे, कोणासोबत गाडीत बसणे किंवा एखाद्या कार्यक्रमात एकत्र असणे हा गुन्हा नाही. प्रत्यक्षात गुरुवारी इंदूरच्या विजयनगरमधील स्पा सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. इंदूर आणि थायलंडच्या 10 मुलींसह 8 मुलांना अटक करण्यात आली.

सेक्स रॅकेटच्या आरोपीचे फोटो प्रसिद्ध झाले
अटक करण्यात आलेल्या 8 मुलांपैकी 3 हे खांडव्यातील आहेत. हा खांडवा भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकारी आहे. सेक्स रॅकेटप्रकरणी खांडव्यातील तीन तरुणांना अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेल्या मुलांमध्ये वरुण यादव, विवेक नामदेव आणि अशोक सिंगला यांचा समावेश आहे. भाजपने नामुष्कीनंतर पक्षातूनही हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा यांनी मंत्र्यासोबत अटक करण्यात आलेल्या तरुणांचा फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध केला आणि तिन्ही आरोपी हे मंत्र्यांच्या जवळचे असल्याचे सांगितले. हे प्रकरण दडपल्याचा आरोपही त्यांनी केला.

Web Title: BJP connections for sex racket rejected by Forest Minister, given explaination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.