गर्भपात करण्यास हायकोर्टाने दिली मुभा, १० वर्षाच्या मुलीवर केला होता लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 06:10 PM2022-03-10T18:10:35+5:302022-03-10T18:11:02+5:30

High court allows abortion : मुलीला दिलासा देत हायकोर्टाने तिरुअनंतपुरममधील एसएटी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय गर्भपात करण्यास परवानगी दिली आहे.

High court allows abortion, sexual abuse of 10-year-old girl | गर्भपात करण्यास हायकोर्टाने दिली मुभा, १० वर्षाच्या मुलीवर केला होता लैंगिक अत्याचार

गर्भपात करण्यास हायकोर्टाने दिली मुभा, १० वर्षाच्या मुलीवर केला होता लैंगिक अत्याचार

googlenewsNext

केरळउच्च न्यायालयाने गुरुवारी अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यास परवानगी दिली. तिरुअनंतपुरममधील एसएटी हॉस्पिटलमध्ये ३० आठवड्यांहून अधिक काळ गर्भवती असलेल्या या १० वर्षीय मुलीच्या वैद्यकीय गर्भपाताला हायकोर्टाने परवानगी दिली आहे. बलात्कारानंतर आपली मुलगी गरोदर राहिल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला होता. मुलीला दिलासा देत हायकोर्टाने तिरुअनंतपुरममधील एसएटी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय गर्भपात करण्यास परवानगी दिली आहे.

पीडितेची तपासणी करण्यासाठी गठित केलेल्या वैद्यकीय मंडळाने असे मत व्यक्त केले होते की, प्रक्रियेदरम्यान मूल जिवंत राहण्याची ८० टक्के शक्यता आहे. त्यानंतर न्यायालयाने राज्य सरकार आणि रुग्णालयाला अर्भक जिवंत राहिल्यास सर्व आवश्यक वैद्यकीय मदत देण्यास सांगितले. 

या निर्देशांसह उच्च न्यायालयाने पीडित मुलीच्या आईने दाखल केलेल्या याचिकेला परवानगी दिली. या याचिकेत पीडितेच्या आईने गर्भपाताची परवानगी मागितली होती. यासोबतच इतक्या कमी वयात गर्भवती झालेल्या १० वर्षांच्या मुलीची अवस्था दुर्दैवी असल्याचेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

वैद्यकीय मंडळाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, गर्भपातासाठी शस्त्रक्रिया करावी लागेल आणि मूल जगण्याची ८० टक्के शक्यता आहे. या प्रक्रियेमुळे बाळाच्या आरोग्याबाबत वैद्यकीय गुंतागुंत निर्माण होऊ शकते आणि नवजात अर्भकाला वैद्यकीय धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही बोर्डाने म्हटले आहे.

Web Title: High court allows abortion, sexual abuse of 10-year-old girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.