'कोणता देव अशा नराधमाची प्रार्थना स्विकार करत असेल', बलात्कार प्रकरणी पुजाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 07:06 PM2021-09-24T19:06:29+5:302021-09-24T19:06:48+5:30

एका बलात्कार प्रकरणाची सुनावणी करताना केरळ हायकोर्टाने ही टिप्पणी केली आहे.

kerala high court sentenced temple priest to life imprisonment for raping a girl | 'कोणता देव अशा नराधमाची प्रार्थना स्विकार करत असेल', बलात्कार प्रकरणी पुजाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा

'कोणता देव अशा नराधमाची प्रार्थना स्विकार करत असेल', बलात्कार प्रकरणी पुजाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा

Next

कोची:केरळउच्च न्यायालयाने बलात्कार प्रकरणातील आरोपी असलेल्या एका मंदिरातील पुजाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा सुनावताना न्यायालयाने एक टिप्पणी केली. 'आश्चर्य वाटतं की, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या अशा पुजाऱ्याची प्रार्थना कोणता देव स्विकार करत असेल,' असं न्यायालयाने आपल्या टिप्पणीमध्ये म्हटलं आहे.

"मिस्टर 56 चीनला घाबरतात"; काँग्रेस नेते राहुल गांधींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र

न्यायमूर्ती के विनोद आणि झियाद रेहमान एए यांच्या खंडपीठानं मांजेरी येथील रहिवासी असलेल्या आरोपी मधु याला ही शिक्षा सुनावली आहे. तसेच, न्यायालयानं आपल्या निर्णयात म्हटले आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती आपली पत्नी आणि मुलांना सोडून देते, तेव्हा समाजातील नराधम त्या अबाल स्त्रीलाच नव्हे तर मुलांनाही शिकार बनवतात. या प्रकरणात आम्ही एक पुजारी पाहिला ज्याने, नवऱ्याने सोडून दिलेल्या एका पीडित कुटुंबाला आपल्याजवळ ठेवून घेतलं. त्यानंतर त्या नराधमाने वारंवार अल्पवयीन मुलीवर तिच्या भावंडासमोर अत्याचार केला. आम्हाला आश्चर्य वाटतं की, कोणत्या देवाने अशा पुजाऱ्याची प्रार्थना स्वीकारली असेल किंवा त्याला माध्यम मानले असेल? 

वैद्यकीय तपासणीत लैंगिक अत्याचाराची पुष्टी

न्यायालयानं पुढे सांगितलं की, आरोपी मंदिराचा पुजारी दारुच्या नशेत घरी यायचा आणि आई आणि मुलांना मारहाण करायचा. तसेच, मोठ्या मुलीवर तिच्या भावंडांसमोर लैंगिक अत्याचार करायचा. वैद्यकीय तपासणीत लैंगिक अत्याचाराची पुष्टी झाली असून मुलीचा भाऊही या गुन्ह्याचा साक्षीदार असल्याचं न्यायालयाने म्हटले आहे.

Web Title: kerala high court sentenced temple priest to life imprisonment for raping a girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.