"काँग्रेस आमदाराच्या मुलाने बलात्कार केला, जीवे मारण्याची दिली धमकी", महिला कार्यकर्तीचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 05:17 PM2021-04-03T17:17:24+5:302021-04-03T17:21:16+5:30
Karan Morwal Rape Case has been Registered : आमदाराच्या मुलाने जीवे मारण्याची देखील धमकी दिल्याचा गंभीर आरोप युवा काँग्रेसच्या एका महिला कार्यकर्तीने केला आहे.
इंदूर - मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. काँग्रेस आमदाराच्या मुलाविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच आमदाराच्या मुलाने जीवे मारण्याची देखील धमकी दिल्याचा गंभीर आरोप युवा काँग्रेसच्या एका महिला कार्यकर्तीने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बडनगर भागातील काँग्रेसचे आमदार मुरली मोरवाल यांचा मुलगा करण मोरवाल याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करणने लग्नाचं आमिष दाखवत फेब्रुवारी महिन्यात बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
स्टेशन प्रभारी ज्योती शर्मा यांनी पीडितेच्या जबाबाच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीने गेल्या वर्षी करणशी ओळख झाली होती. त्यानंतर काही महिन्यांआधी तो तरुणीला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. त्याने बलात्कार केला तसेच कोणाला काही सांगितल्यास किंवा पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली असा आरोप पीडित तरुणीने केला आहे. तसेच याची एक ऑडिओ क्लिप असल्याचं देखील तिने म्हटलं आहे.
संतापजनक! बलात्काराच्या घटनेने परिसरात खळबळ, एकाला अटकhttps://t.co/iFenzygvRn#crime#crimenews#Rape#Police
— Lokmat (@MiLOKMAT) March 25, 2021
आमदाराच्या मुलाने आपल्याला धमकी दिल्याचा आणि याचा ऑडिओ रेकॉर्डिंग स्वरुपात आपल्याकडे पुरावा असल्याचा दावा संबंधित तरुणीने केला आहे. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचं म्हटलं आहे. तर काँग्रेस आमदार मुरली मोरवाल यांनी आपल्या मुलाविरुद्ध करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. पीडित तरुणी ही काँग्रेसची एक कार्यकर्ती आहे. गेल्या वर्षी तिची करण सोबत ओळख झाली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
धक्कादायक! भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या, गेल्या 8 दिवसांत हत्येच्या 7 घटनांनी खळबळ
उत्तर प्रदेशमध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे. भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 8 दिवसांत तब्बल हत्येच्या 7 घटना घडल्या आहेत. गोरखपूरमधील भाजपचे नेते आणि ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले माजी सरपंच बृजेश सिंह (BJP Brijesh Singh) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्येच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गेल्या आठ दिवसांत हत्येच्या तब्बल सात घटना घडल्याने गोरखपूरमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
खळबळजनक! निवडणूक प्रचारावरून परतत असताना झाडल्या गोळ्या, हत्येच्या वाढत्या घटनांमुळे दहशतीचे वातावरणhttps://t.co/LzZ7kYKfMg#crime#CrimeNews#BJP#Murder#Police
— Lokmat (@MiLOKMAT) April 3, 2021