पीडितेच्या मांडीला हात लावणे किंवा अश्लील कृत्य करणे म्हणजे बलात्कारच- केरळ हायकोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 01:30 PM2021-08-05T13:30:03+5:302021-08-05T13:30:06+5:30
Keral highcourt verdict: 2015 मध्ये आरोपीने एका अल्पवयीन मुलीच्या मांड्यांसोबत अश्लील कृत्य केलं होतं.
नवी दिल्ली: पीडितेच्या मांडीला हात लावणे किंवा अश्लील कृत्य करणे म्हणजे बलात्कारच आहे, अशी स्पष्ट टिप्पणी केरळ हायकोर्टाने केली आहे. बलात्काराच्या एका प्रकरणाची सुनावणी करताना कोर्टाने म्हटले की, आरोपीने पीडितेच्या मांड्यावर हात लावला किंवा काही अश्लील कृत्य केले तर त्याला भारतीय दंड संहितेच्या कलम 375 नुसार, बलात्कारास जबाबदार धरले जाईल.
जस्टिस के. विनोद चंद्रण आणि जस्टिस जियाद रहमान यांच्या खंडपिठाने हा निर्णय 2015 च्या एका बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान दिला. याप्रकरणात आजीवन कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने 2015 मध्ये एका 11 वर्षीय मुलीवर लैंगित अत्याचार केला होता.
काय आहे घटना ?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या घराशेजारी राहणाऱ्या एका 11 वर्षीय मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्या मांड्यासोबत अश्लील चाळे केल होते. प्रकरणा वाढल्यानंतर पोलिसांनी आरोला ताब्यात घेतले. या प्रकरणाची कनिष्ठ न्यायालयात सुनावणी झाली आणि पॉक्सो अॅक्ट आणि अनैसर्गिक लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आरोपीला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
या शिक्षेविरोधात आरोपीने उच्च न्यायालयात अर्ज करुन मांड्यांना हात लावणे बलात्कार कसा होऊ शकतो, असा प्रश्न केला होता. आरोपीच्या वकीलाने कोर्टात युक्तीवाद करताना, मांड्यांसोबत अश्लील कृत्य करणे 375 अंतर्गत येऊ शकत नाही, असे म्हटले होते. त्यावर कोर्टाने वजाइना, यूरेथ्रा, एनस किंवा शरीराच्या इतर भागांना हात लावून छेडछाड केल्यास आयपीसी कलम 375 अंतर्गत बलात्कार ठरवून शिक्षा करता येते, असे सांगितले.