Fact Check : काँग्रेस सर्व भारतीय युजर्सना मोफत रिचार्ज देतेय?; जाणून घ्या, 'सत्य'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 02:46 PM2024-04-26T14:46:05+5:302024-04-26T14:59:30+5:30
Fact Check : काँग्रेस सर्व भारतीय युजर्सना 84 दिवसांचा 719 रुपयांचा रिचार्ज फ्रीमध्ये देत आहे. जाणून घ्या नेमकं 'सत्य'.
Created By: newschecker
Translated By: ऑनलाइन लोकमत
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. याच दरम्यान सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. जास्तीत जास्त मतदारांना आकर्षिक करण्यासाठी त्यांना विविध आश्वासनं दिली जात आहे. अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच काँग्रेस भारतीय युजर्सना मोफत रिचार्ज देत असल्याचं म्हटलं जात आहे.
काँग्रेस सर्व भारतीय युजर्सना 84 दिवसांचा 719 रुपयांचा रिचार्ज फ्रीमध्ये देत आहे. या पोस्टचं आर्काइव येथे पाहा.
हा दावा आम्हाला WhatsApp Tip Line (9999499044) वर देखील प्राप्त झाला आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान, सर्व भारतीय युजर्सना मोफत रिचार्ज देण्याच्या नावाखाली काँग्रेसने शेअर केलेल्या दाव्याची चौकशी करण्यासाठी आम्ही काही कीवर्डवर Google शोधले. आम्हाला दाव्याची पुष्टी करणारे कोणतेही विश्वसनीय रिपोर्ट सापडले नाहीत.
पुढे तपासात आम्ही काँग्रेस, मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांचं अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट आणि काँग्रेसची अधिकृत वेबसाइट शोधली. परंतु या दाव्याला पुष्टी देणारी कोणतीही माहिती आढळली नाही.
आता आम्ही शेअर केलेल्या लिंकवर क्लिक केलं. ही लिंक ‘ऑफर राज’ नावाच्या वेबसाइटवर उघडते. ही वेबसाइट आम्हाला संशयास्पद वाटली, म्हणून आम्ही ती स्कॅम डिटेक्टरवर तपासली. स्कॅम डिटेक्टर या वेबसाइटला असुरक्षित आणि धोकादायक म्हणून रेट करतो.
पुढील तपासात, जेव्हा आम्ही या वेबसाइटवर रिचार्जचा लाभ मिळवण्यासाठी दिलेल्या बटणावर क्लिक करतो तेव्हा आम्हाला आढळलं की ही एक फिशिंग लिंक आहे, जी आम्हाला ब्लॉग स्पॉटच्या वेबसाइटवर घेऊन जाते. ब्लॉग स्पॉटच्या मदतीने तयार केलेल्या या पेजवर, युजर्सना त्यांचा मोबाइल नंबर विचारला जातो.
तपासात पुढे, ‘who is’ या वेबसाइटशी संबंधित इतर माहितीची देखील तपासणी करतो. हे डोमेन 28 मार्च 2023 रोजी राजस्थानमध्ये ‘HIOX SOFTWARES PRIVATE LIMITED’ या नावाने नोंदणीकृत झाल्याचे येथे नमूद केले आहे.
आमच्या तपासणीतून, आम्ही या निष्कर्षाप्रत पोहोचलो की सर्व भारतीय युजर्सना फ्री रिचार्ज देण्याच्या नावाखाली काँग्रेसचा व्हायरल दावा खोटा आहे. आम्ही आमच्या वाचकांना आवाहन करतो की कृपया कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासा. या लिंक्स धोकादायक असू शकतात.
निष्कर्ष - False
Sources
Official website of Congress.
Official X handles of Congress, Rahul Gandhi and Mallikarjun Kharge.
Scam Detector.
Whois.com.
(सदर फॅक्ट चेक newschecker या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)