Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 11:28 AM2024-05-02T11:28:16+5:302024-05-02T12:26:48+5:30

Fact Check : पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भाषणाचा व्हिडीओ कोलाज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात पंतप्रधान म्हणतात की, मोदी जिंकले तर आरक्षण संपेल. पंतप्रधानांनी केलेलं विधान म्हणून युजर्स ते खूप शेअर करत आहेत. पण हा दावा खोटा आहे.

Fact Check Reservation will end if Modi wins; Clip Goes Viral With False Claims, Know The 'Truth' | Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'

Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'

Claim Review : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"
Claimed By : Twitter User
Fact Check : चूक

Created By: bhasha.ptinews
Translated By: ऑनलाइन लोकमत

नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भाषणाचा व्हिडीओ कोलाज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जवळपास 27 सेकंदांच्या या क्लिपमध्ये पंतप्रधान मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल असं म्हणताना ऐकू येतं. व्हिडीओ कोलाजमध्ये राहुल गांधीआरक्षणाच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांवर निशाणा साधताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडीओ शेअर करताना युजर्स दावा करत आहेत की, पंतप्रधानांनी स्वत:च आरक्षण संपवण्याचं सांगितलं आहे.पीटीआय फॅक्ट चेक डेस्कने तपास केला आणि व्हायरल व्हिडीओ खोटा असल्याचं आढळलं. खरं तर उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या फ्लॉप चित्रपटातील संवादाचा उल्लेख करताना हे विधान केलं होतं. युजर्स मोदींच्या भाषणाचा अर्धवट भाग हा सोशल मीडियावर खोट्या दाव्यांसह शेअर करत आहेत.

दावा

पंतप्रधान महाराष्ट्र काँग्रेस सेवा दल नावाच्या एका 'एक्स' युजरने व्हायरल व्हिडिओसोबत लिहिलं की, "मोदींनी आरक्षण संपवण्याची कबुली केव्हा दिली ते ऐका." पोस्टची लिंक, आर्काइव लिंक आणि स्क्रीनशॉट येथे पाहा.

शेष नारायण गुप्ता नावाच्या 'एक्स' युजरने "मोदी आरक्षण संपवण्याविषयी बोलतात, राहुल गांधी आरक्षण वाचवण्याविषयी बोलतात" असं म्हटलं आहे. पोस्टची लिंक, आर्काइव लिंक आणि स्क्रीनशॉट येथे पाहा.

पडताळणी

सोशल मीडियावर व्हायरल दाव्याचे सत्य जाणून घेण्यासाठी, डेस्कने संबंधित कीवर्डच्या मदतीने प्रथम Google वर सर्च केलं. यावेळी, ईटीव्ही भारत या न्यूज वेबसाइटवर पंतप्रधानांच्या विधानाशी संबंधित एक रिपोर्ट प्राप्त झाला.

25 एप्रिल रोजी प्रकाशित झालेल्या या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील लोकसभा उमेदवार अरुण सागर यांच्या बाजूने एका जाहीर सभेला संबोधित केलं. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आणि फ्लॉप चित्रपटातील काँग्रेस पक्षाच्या डायलॉगच्या संदर्भात ते म्हणाले की, काँग्रेसचा पहिला डायलॉग आहे की मोदी जिंकले तर हुकूमशाही येईल आणि दुसरा डायलॉग म्हणजे मोदी जिंकले तर आरक्षण निघून जाईल. येथे क्लिक करून संपूर्ण रिपोर्ट वाचा.

तपासादरम्यान, आम्हाला भाजपाच्या यूट्यूब चॅनलवर आणि उत्तर प्रदेश भाजपाच्या अधिकृत X अकाऊंटवर शाहजहांपूरमध्ये झालेल्या सभेचा संपूर्ण व्हिडीओ सापडला. व्हायरल क्लिप व्हिडिओच्या 24:55-26:30 मिनिटांच्या भागात पाहिली जाऊ शकते.

भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधत, पुन्हा एकदा काँग्रेसने आपला फ्लॉप चित्रपट प्रदर्शित केला आहे. काँग्रेसच्या या चित्रपटात दोन डायलॉग आहेत. पहिला डायलॉग म्हणजे मोदी जिंकले तर हुकूमशाही येईल. तुम्ही याच्याशी सहमत आहात का...?? तुम्ही सहमत आहात का...?? तरीही त्याचा फ्लॉप चित्रपट सुरूच आहे. दुसरा डायलॉग - मोदी जिंकले तर आरक्षण निघून जाईल. असे खोटे - ते असे खोटे पसरवत राहतात... पण काँग्रेसच्या या चित्रपटाचा ट्रेलर त्यांच्या जाहीरनाम्यात येताच तुम्ही पाहिलं असेल... लोकांनी ते वाचलं आणि कळलं... मग हाच खरा चेहरा आहे. काँग्रेस... काँग्रेसचा खरा हेतू... आणि काँग्रेसचा छुपा अजेंडा काय आहे हे देशाला कळलं आहे... देशाला धक्का बसला... आणि आता एक एक करून त्यांचं सत्य देशासमोर येत आहे. येथे क्लिक करून पूर्ण व्हिडीओ पाहा.

आमच्या आतापर्यंतच्या तपासातून हे स्पष्ट झालं आहे की, पंतप्रधानांच्या भाषणाचे अर्धवट भाग खोटे दावे करून सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.

दावा

मोदी जिंकले तर आरक्षण संपेल.

वस्तुस्थिती

पीटीआय फॅक्ट चेक डेस्कने तपास केला आणि व्हायरल दावा खोटा असल्याचं आढळलं.

निष्कर्ष

पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भाषणाचा व्हिडीओ कोलाज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात पंतप्रधान म्हणतात की, मोदी जिंकले तर आरक्षण संपेल. पंतप्रधानांनी केलेलं विधान म्हणून युजर्स ते खूप शेअर करत आहेत. पीटीआय फॅक्ट चेक डेस्कने तपास केला आणि व्हायरल दावा खोटा असल्याचे आढळलं. खरंतर उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या फ्लॉप चित्रपटातील डायलॉगचा उल्लेख करताना हे विधान केलं होतं. युजर्स भाषणातील अर्धवट भाग हे खोट्या दाव्यासह सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

(सदर फॅक्ट चेक bhasha.ptinews.com या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)
 

Web Title: Fact Check Reservation will end if Modi wins; Clip Goes Viral With False Claims, Know The 'Truth'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.