Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 12:01 PM2024-05-01T12:01:08+5:302024-05-01T12:02:41+5:30

Lok sabha Election 2024 - लोकसभा निवडणुकीच्या २ टप्प्यानंतर आता उर्वरित टप्प्यातील प्रचार सुरू झाला आहे. त्यात बहुचर्चित अमेठी, रायबरेली मतदारसंघात काँग्रेसकडून राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यात एक कथित प्रेस नोट व्हायरल झाली.

Fact Check: The Press Release that Rahul Gandhi was nominated from Amethi and Priyanka Gandhi from Rae Bareli is false; Know the truth | Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य

Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य

Claim Review : काँग्रेसनं राहुल गांधींना अमेठी आणि प्रियंका गांधींना रायबरेलीतून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली
Claimed By : Facebook User
Fact Check : चूक

Created By: PTI
Translated By: ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीत अमेठी आणि रायबरेली या मतदारसंघातून काँग्रेसच्या गांधी कुटुंबातील व्यक्ती रिंगणात उतरणार अशी चर्चा सुरू आहे. त्यात सोशल मीडियावर काँग्रेस पक्षाची प्रेस रिलीज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात अमेठीतून राहुल गांधी तर रायबरेलीतून प्रियंका गांधी वाड्रा यांना उमेदवार घोषित केल्याचा दावा करण्यात आला आहे. ही कथित प्रेस नोट सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर शेअर केली गेली आहे.

ज्यावेळी या प्रेस रिलीजबाबत पडताळणी केली तेव्हा हा दावा खोटा असल्याचं पुढे आले. काँग्रेस पक्षाकडून अद्याप रायबरेली, अमेठी या दोन्ही मतदारसंघात कुठल्याही उमेदवाराची घोषणा केली नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही प्रेस रिलीज बनावट आणि खोटी आहे. 

काय होता दावा?

बिहार युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष संजीव सिंह यांनी फेसबुकवर काँग्रेसची कथित प्रेस रिलीज शेअर करत दावा केला की, राहुल गांधी यांना अमेठी आणि प्रियंका गांधी यांना रायबरेलीतून लोकसभा उमेदवार बनवल्याबद्दल शुभेच्छा...

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह


तर अमेठी लोकसभा या फेसबुक पेजने आणखी एक प्रेस रिलीज शेअर करून दावा केला आहे की प्रियंका गांधी यांना अमेठी लोकसभा मतदारसंघातून उमेदवार करण्यात आले आहे आणि राहुल गांधी यांना रायबरेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवार करण्यात आले आहे. 

ही पोस्ट या लिंकवर पाहा | आर्काइव्ह

याप्रकारे अनेक युजर्सने प्रेस रिलीज शेअर करत हे दावे केले आहेत. 

पडताळणी काय आढळलं?

या व्हायरल दाव्यामागील सत्य जाणून घेण्यासाठी सर्वात आधी दोन्ही प्रेस रिलीज लक्षपूर्वक पाहण्यात आल्या. त्यातील एकात राहुल आणि प्रियंका गांधी यांना अमेठी व रायबरेली येथील उमेदवार सांगितले. तर दुसऱ्या प्रेस रिलीजमध्ये दोन्ही जागांच्या उमेदवारांच्या नावाची अदलाबदल करण्यात आली. या दोन्ही प्रेस रिलीजवर काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाळ यांची स्वाक्षरी होती आणि ३० एप्रिलला ही जारी करण्यात आली होती. त्यामुळे या प्रेस रिलीजवर शंका उपस्थित झाली. 

पडताळणीत पुढे काँग्रेस पक्षाचं अधिकृत सोशल मिडिया खाते आणि वेबसाईट तपासले. त्यात रायबरेली आणि अमेठी लोकसभा मतदारसंघातून कुठल्याही उमेदवाराच्या घोषणेबाबत माहिती मिळाली नाही. पडताळणीत काँग्रेस पक्षाच्या फेसबुक आणि एक्स अकाऊंटवर ३० एप्रिलला जारी झालेल्या उमेदवारांची यादी सापडली. 

काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीनुसार हरियाणातील गुडगावमधून राज बब्बर, हिमाचल प्रदेशातील हमीरपूरमधून सतपाल रायजादा, हिमाचल प्रदेशातील कांगडा येथून आनंद शर्मा आणि महाराष्ट्रातील उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भूषण पाटील यांना तिकीट देण्यात आले आहे. या यादीत रायबरेली आणि अमेठीच्या जागांचा उल्लेख नव्हता. काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीची लिंक येथे क्लिक करून पाहा

त्यानंतर, डेस्कने संबंधित कीवर्डच्या मदतीने गुगलवर शोध घेतला. यावेळी एनडीटीव्हीच्या वेबसाइटवर पीटीआय भाषेतील बातमी सापडली. या बातमीत सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, काँग्रेस पक्ष अमेठी आणि रायबरेलीमधील उमेदवार निश्चित करण्याच्या अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच नावे जाहीर केली जातील. २६ एप्रिलपासून अमेठी आणि रायबरेलीमध्ये नामांकन प्रक्रिया सुरू झाली असून ती ३ मेपर्यंत चालणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, काँग्रेसकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. येथे क्लिक करून संपूर्ण बातमी वाचा.


TimesNow च्या वृत्ताचा हवाला देत इकॉनॉमिक टाईम्सने बातमी दिली की, प्रियंका गांधी वाड्रा आणि राहुल गांधी कदाचित उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाहीत. प्रियंका गांधींना निवडणूक लढवण्याऐवजी संपूर्ण भारतभर काँग्रेसचा प्रचार करायचा आहे आणि पक्षावर लक्ष केंद्रित करायचे आहे असं बातमीत सांगितले आहे. येथे क्लिक करून संपूर्ण बातमी वाचा.

पडताळणीत शेवटी काँग्रेस नेते विनीत पुनिया यांची प्रतिक्रिया मिळाली, ही प्रेस रिलीज फेक असल्याचं ते म्हणाले. 

दावा - 

काँग्रेसनं राहुल गांधींना अमेठी तर प्रियंका गांधी वाड्रा यांना रायबरेली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

तथ्य - 

पीटीआयच्या फॅक्ट चेक पडताळणीत हा दावा चुकीचा आणि खोटा आढळला. 

निष्कर्ष 

सोशल मीडियावर काँग्रेस पक्षाकडून एक कथित प्रेस रिलीज शेअर करत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याबाबत जो दावा केला जात आहे. तो पूर्णत: चुकीचा आणि खोटा आहे. काँग्रेसनं अद्याप अमेठी आणि रायबरेली मतदारसंघातून कुणालाही उमेदवारी जाहीर केली नाही. 

(सदर फॅक्ट चेक PTI या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)

Web Title: Fact Check: The Press Release that Rahul Gandhi was nominated from Amethi and Priyanka Gandhi from Rae Bareli is false; Know the truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.