'आदिपुरुष' चित्रपटाविरोधात दिल्ली HC मध्ये याचिका; भगवान श्रीरामाचा अपमान केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 07:23 PM2023-06-16T19:23:44+5:302023-06-16T19:24:08+5:30
बहुप्रतिक्षित अदिपुरुष चित्रपट रिलीज झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
Adipurush Movie: आज(16 जून) बहुप्रतिक्षित 'आदिपुरुष' चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला आहे. चित्रपट रिलीज होताच विरोधही सुरू झाला आहे. या चित्रपटाला हिंदू सेना विरोध करत आहे. चित्रपटात भगवान श्रीरामांची खिल्ली उडवण्यात आल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे दिल्लीउच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी उच्च न्यायालयाने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनला (CBFC) या चित्रपटाला प्रमाणपत्र देऊ नये, असे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे.
महर्षी वाल्मिकी आणि संत तुलसीदास यांनी लिहिलेल्या रामायणात भगवान श्री राम दाखविल्याप्रमाणे हा चित्रपट नाही, असे जनहित याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे या चित्रपटातून धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकरणी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाशीही संपर्क साधण्यात आला होता, मात्र त्यांनी त्यात रस दाखवला नाही, असे याचिकेत म्हटले आहे.
Overwhelmed with all the love! 🫶#AdipurushTrailer trending at #1 on #YouTube 🏹
— Om Raut (@omraut) May 9, 2023
Trailer out now - https://t.co/hax5G3AXlO#Adipurush#Prabhas#SaifAliKhan@kritisanon@mesunnysingh#BhushanKumar#KrishanKumar@vfxwaala@rajeshnair06@DevdattaGNage@AjayAtulOnlinepic.twitter.com/eR5rHSm2O3
चित्रपटात सैफ अली खान रावण लूक आणि देवदत्त नागेचा हनुमान लूक भारतीय सभ्यतेशी जुळत नसल्याचे याचिकेत म्हटले आहे. रावण हा ब्राह्मण होता. रावणाला दाढीवाढवून उग्र दाखवण्यात आले आहे, त्यामुळे भावना दुखावल्या जाणार आहेत. हे रामायणातील वास्तविक कथेशी अजिबात जुळत नाही, असेही याचिकेत म्हटले आहे.
चित्रपटाच्या संवादावरूनही वाद
आदिपुरुष चित्रपटात अनेक ठिकाणी अशी भाषा वापरली गेली आहे, जी त्रेतायुगात भगवान श्रीराम आणि रामायणाच्या वेळी वापरलेल्या भाषेशी खरोखर जुळत नाही. चित्रपटात एके ठिकाणी संवाद वापरण्यात आला आहे, 'तेरी जली ना?' तर दुसऱ्या ठिकाणी 'तेरे बाप की आग तेरे बाप की…' ही ओळ वापरण्यात आली आहे. यामुळेच जवळपास 500 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या सुरुवातीचे रिव्ह्यू चांगले आले नाहीत.