या अभिनेत्रीने चक्क राहुल गांधी यांचा व्हिडिओ शेअर करत म्हटले स्वीट, सगळीकडे रंगलीय चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 06:44 PM2021-02-18T18:44:12+5:302021-02-18T18:45:15+5:30

राहुल गांधी यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Actress Swara Bhaskar Called Rahul Gandhi sweet on his video | या अभिनेत्रीने चक्क राहुल गांधी यांचा व्हिडिओ शेअर करत म्हटले स्वीट, सगळीकडे रंगलीय चर्चा

या अभिनेत्रीने चक्क राहुल गांधी यांचा व्हिडिओ शेअर करत म्हटले स्वीट, सगळीकडे रंगलीय चर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देराहुल गांधी यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. राहुल यांचा हा व्हिडिओ अभिनेत्री स्वरा भास्करने देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि त्यासोबत स्वीट असे लिहिले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या पाँडिचेरीच्या दौऱ्यावर आहेत. तिथे एप्रिल आणि मे महिन्यात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी राहुल गांधी प्रचार करत आहेत. त्यांनी नुकतीच कॉलेजमधील काही मुलांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान मुलांनी राहुल यांना सर म्हणून हाक मारली होती. यावर राहुल गांधी यांनी दिलेल्या उत्तराची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे. 

राहुल यांनी उत्तर दिले की, माझे नाव सर नाहीये, राहुल आहे. त्यामुळे तुम्ही मला राहुल अशीच हाक मारा... तुम्ही तुमच्या शिक्षकांना सर अशी हाक मारा... राहुल यांच्या उत्तरावर मुलं प्रचंड खूश झाले. एवढेच नव्हे तर आम्ही तुम्हाला राहुल अण्णा अशी हाक मारली तर चालेल का असे मुलांनी त्यांना विचारले... त्यावर राहुल यांनी लगेचच यासाठी होकार दिला. 

राहुल गांधी यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. राहुल यांचा हा व्हिडिओ अभिनेत्री स्वरा भास्करने देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि त्यासोबत स्वीट असे लिहिले आहे.

स्वरा भास्कर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती ट्विटरवर अनेक सामाजिक प्रश्नांवर आपले मत व्यक्त करत असते. ती सोशल मीडियावर अनेक वेळा समोरच्यांची बोलती बंद करते तर काही वेळा तिला तिच्या मतांसाठी ट्रोल देखील केले जाते.
 

Web Title: Actress Swara Bhaskar Called Rahul Gandhi sweet on his video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.