Ajmer 92: ‘250 तरुणी जाळ्यात अडकल्या’, काश्मीर फाईल्स आणि केरळ स्टोरीनंतर "अजमेर 92" ची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 07:20 PM2023-05-29T19:20:01+5:302023-05-29T19:21:02+5:30
Ajmer 92: 'द काश्मीर फाईल्स' आणि 'द केरळ स्टोरी' नंतर अजमेरची कहानी मोठ्या पडद्यावर येणार आहे.
Ajmer 92 Film: 2022 मध्ये रिलीज झालेला विवेक अग्निहोत्रीचा 'द काश्मीर फाईल्स' असो किंवा नुकताच रिलीज झालेला सुदीप्तो सेनचा 'द केरला स्टोरी' असो, दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. काश्मीर फाइल्सने 250 कोटींहून अधिक कमाई केली होती, तर केरळ स्टोरीही लवकरच हा आकडा पार करणार आहे.
काश्मीर फाईल्समध्ये काश्मिरी पंडितांवरील अत्याचार आणि त्यांच्या पलायनाची कहाणी दाखवण्यात आली होती. तर, द केरळ स्टोरीबाबत निर्मात्यांनी दावा केलाय की, हा चित्रपट केरळमधील एका सत्य घटनेवर आधारित आहे. केरळमधील 32,000 हून अधिक मुलींचे ब्रेनवॉश करुन धर्मांतर केल्याचा दावा आहे. दरम्यान, काश्मीर आणि केरळनंतर आता अजमेरच्या कथेवर चित्रपट येणार आहे.
अजमेरच्या कथेवर चित्रपट
‘AJMER 92’ TO RELEASE ON 14 JULY… A #RelianceEntertainment presentation, #Ajmer92 will release in *cinemas* on 14 July 2023… Stars #KaranVerma, #SumitSingh, #SayajiShinde and #ManojJoshi… Directed by #PushpendraSingh… Produced by #UmeshKumarTiwari. pic.twitter.com/ddKnAedh6D
— taran adarsh (@taran_adarsh) May 26, 2023
अजमेरच्या एका सत्य घटनेवर चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. 'अजमेर 92' असे या चित्रपटाचे शीर्षक आहे. हा चित्रपट रिलायन्स एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनवला जाणार आहे, ज्याचे दिग्दर्शन पुष्पेंद्र सिंह करत आहेत. नुकतंच या चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे.
250 मुलींची कहाणी
अजमेर 92 चे पोस्टर आले आहे, ते अनेक वृत्तपत्रांच्या कटिंग्जमधून तयार करण्यात आले आहे. यामध्ये अनेक मोठ्या आणि खळबळजनक हेडलाइन्स दिसत आहेत. जसे- '250 महाविद्यालयीन तरुणी अडकल्या जाळ्यात, नग्न फोटो शेअर', 'एकामागून एक आत्महत्येवरून उठला पडदा', 'ही आत्महत्या नसून हत्या आहे, यामागे शहरातील बडे लोक आहेत'.
काय आहे अजमेर घटना?
रिपोर्ट्सनुसार, 1992 मध्ये अजमेरमध्ये अशी घटना घडली होती, ज्याने सर्वांनाच धक्का बसला होता. अजमेरमध्ये जवळपास 300 मुलींना न्यूड फोटोच्या नावाखाली ब्लॅकमेल करून त्यांच्यावर बलात्कार केल्याचे सांगण्यात येते. ही घटना शहरातील एक बडे कुटुंब आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी घडवून आणल्याचे बोलले जाते. मेकर्सनी पोस्टरमध्ये 250 मुलींचा उल्लेख केला आहे. हा चित्रपट 14 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.