"ना बहु मिलती है और ना ही बहुमत", दिल्ली विधानसभा निवडणुकीवरुन बॉलिवूड अभिनेत्याचा राहुल गांधींना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 15:24 IST2025-02-08T15:23:47+5:302025-02-08T15:24:15+5:30
दिल्ली विधानसभेतील काँग्रेसच्या स्थितीवरुन बॉलिवूड अभिनेते आणि माजी खासदार परेश रावल यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे.

"ना बहु मिलती है और ना ही बहुमत", दिल्ली विधानसभा निवडणुकीवरुन बॉलिवूड अभिनेत्याचा राहुल गांधींना टोला
Delhi Election Result: देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दिल्लीमधील विधानसभेच्या ७० जागांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. दिल्लीमध्ये सत्ताधारी आप, मुख्य विरोधी पक्ष असलेला भाजपा यांच्यात मुख्य लढत होती. तर काँग्रेसनेही या दोन्ही पक्षांना जोरदार टक्कर दिली आहे. त्यामुळे निकालांबाबत उत्सुकता आहे. पण, या निवडणुकीत काँग्रेसला अद्याप खातं उघडता आलेलं नाही.
दिल्ली विधानसभेतील काँग्रेसच्या स्थितीवरुन बॉलिवूड अभिनेते आणि माजी खासदार परेश रावल यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे. परेश रावल यांनी त्यांच्या X अकाऊंटवरुन एक ट्वीट केलं आहे. एका युजरचं ट्वीट परेश रावल यांनी रिट्वीट केलं आहे. या ट्विटमध्ये राहुल गांधींचा फोटो शेअर करत "इतिहास घडवण्यापासून राहुल गांधी काही तासच दूर आहेत. 100th Successful failure...या ऐतिहासिक प्रवासाचा भाग झाल्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा", असं या ट्वीटमध्ये म्हटलं गेलं आहे. हे ट्वीट शेअर करत परेश रावल यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे.
एक माँ का दर्द समझो । ना बहू मिलती हैं और ना ही बहूमत मिलता हैं । https://t.co/zc0TY5uHDj
— Paresh Rawal (@SirPareshRawal) February 8, 2025
"एका आईचं दु:ख समजून घ्या...ना बहू मिलती हैं और ना ही बहुमत मिलता हैं", असं परेश रावल यांनी म्हटलं आहे. दरम्यान, परेश रावल यांनी आणखी एक ट्वीट शेअर करत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही टीका केली आहे.
Well said ! https://t.co/EAnpe8vE4k
— Paresh Rawal (@SirPareshRawal) February 8, 2025
दिल्लीमध्ये सत्तारुढ आम आदमी पार्टीला आत्तापर्यंत २३ जागांवर विजय मिळवता आला आहे. तर भाजपाने दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत ४७ जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे पूर्ण बहुमतासह दिल्लीत यंदा भाजपाची सत्ता येणार असल्याचं चित्र आहे.