‘मला चुकीचं समजू नका...’, Sidhu Moosewala यांची अखेरची इन्स्टा पोस्ट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 10:25 AM2022-05-30T10:25:56+5:302022-05-30T10:31:39+5:30
पंजाबचे गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला (Sidhu Moosewala ) यांची काल रविवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याचदरम्यान सिद्धू यांची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल होतं आहे.
Sidhu Moosewala shot dead : पंजाबचे गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला (Sidhu Moosewala ) यांची काल रविवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. राज्य सरकारने मुसेवाला यांची सुरक्षा काढून घेतली आणि दुसऱ्याच दिवशी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात अज्ञातांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. मुसेवाला यांना गंभीर अवस्थेत मानसा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पंजाबसह संपूर्ण भारतात खळबळ उडाली आहे. घटनेच्या तीन तासानंतर गँगस्टर गोल्डी ब्रारने फेसबुक पोस्टद्वारे या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.
याचदरम्यान सिद्धू मुसेवाला यांची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल होतं आहे. ही त्यांची अखेरची पोस्ट ठरली. मृत्यूच्या 4 दिवसांपूर्वी त्यांनी ही पोस्ट शेअर केली होती.
सिद्धू यांनी आपल्या गाण्याचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला त्यांनी पंजाबीत कॅप्शन दिलं होतं. ‘हे विसरुन जा, पण मला चुकीचे समजू नका,’ असं त्यांनी कॅप्शन देताना लिहिलं होतं. या व्हिडीओला लाखो व्ह्युज मिळाले होते.
त्यांच्या अखेरच्या ट्विटर पोस्टची सुद्धा चर्चा होतेय. ट्विटरवरच्या आपल्या अखेरच्या पोस्टमध्ये त्यांनी स्वत:चा बंदुकीसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. ‘ U DONEEEEEEE ?????’ असं त्यांनी हा फोटो शेअर करताना लिहिलं होतं. त्यांच्या या ट्विटवरून मोठा वादही निर्माण झाला होता.
सिद्धू यांच्यावर कायम गन व्हायलन्स प्रमोट करण्याचा आरोप केला जात होता. त्यांच्या गाण्यांपासून सोशल मीडिया पोस्टपर्यंत बहुतांश वेळा त्यांना बंदुकीसोबत दाखवले जात होते. गन व्हायलन्ससंदर्भात त्यांच्याविरोधात एक गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
सिद्धू मुसेवाला यांचं नवीन गाणं चार दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालं होतं. लेवल्स असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्याला 6 दिवसांत 60 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.