क्या बात! Ram Charan ने यूक्रेनियन बॉडीगार्डची केली मदत, त्याच्या पत्नीला पाठवले पैसे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 11:44 AM2022-03-24T11:44:49+5:302022-03-24T11:46:46+5:30
Ram Charan helped Ukrainian bodyguard : सिनेमाच्या रिलीजआधीच रामचरणच्या सोशल मीडियावरून कौतुक केलं जात आहे. हे कौतुक रामचरणच्या सिनेमातील कामाबाबत नाही तर एका वेगळ्या कारणासाठी आहे.
साऊथ इंडिनय फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार रामचरण (Ram Charan) याचा RRR सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. सिनेमाच्या रिलीजआधीच रामचरणच्या सोशल मीडियावरून कौतुक केलं जात आहे. हे कौतुक रामचरणच्या सिनेमातील कामाबाबत नाही तर एका वेगळ्या कारणासाठी आहे. रामचरणने यूक्रेनमध्ये राहणाऱ्या त्याच्या एका सिक्युरिटी स्टाफची मदत (Ram Charan helped Ukrainian bodyguard) केली आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्यात Rusty (RRR च्या शूटिंगवेळी ह रामचरणचा पर्सनल बॉडीगार्ड होता) ने रामचरणचे आभार मानले आहे. व्हिडीओत Rusty बोलतो की, हॅलो, माझं नाव रस्टी आहे. जेव्हा रामचरण यूक्रेनच्या कीवमध्ये शूटिंग करत होता तेव्हा मी त्याचा बॉडीगार्ड होतो. काही दिवसांपूर्वी रामचरणने मला कॉन्टॅक्ट केला.
#RamCharan has helped a security officer in Kyiv, Ukraine, who previously operated as his personal security member during #RRR’s shoot in Ukrainian @AlwaysRamCharanpic.twitter.com/kAi4OmmIZd
— BA Raju's Team (@baraju_SuperHit) March 19, 2022
'माझ्या परिवाराबाबत आणि माझ्याबाबत विचारलं. तो म्हणाला की, मी तुझी काय मदत करू शकतो? मी त्याला आता मिल्ट्री जॉइन केल्याचं सांगितलं. त्याने माझ्या पत्नीला पैसे पाठवले आणि मला म्हणाला की, परिवाराची काळजी घे. हे त्याचं मोठेपण आहे'.
RRR च्या टीमने गेल्यावर्षी एका गाण्याचं शूटिंग आणि काही महत्वाच्या सीन्सचं शूटिंग यूक्रेनमध्ये केलं होतं. Rusty तेव्हा सिनेमाच्या टीमचा भाग होता. तेव्हा तो रामचरणचा पर्सनल बॉडीगार्ड होता. दरम्यान RRR सिनेमात रामचरण आणि ज्यूनिअर एनटीआर दिसणार आहे. सोबतच यात आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा २५ मार्चला रिलीज होणार आहे.