इथे लोक मरताहेत आणि तुला..., रशिया-युक्रेनवर मीम शेअर करून अर्शद वारसी चांगलाच फसला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 01:54 PM2022-02-25T13:54:05+5:302022-02-25T13:58:47+5:30

Arshad Warsi on Russia Ukraine Crisis : अभिनेता अर्शद वारसीने युद्धावर मीम शेअर केलं. मग काय, अर्शद नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला. लोकांनी त्याला चांगलंच धारेवर धरलं.

russia ukraine crisis arshad warsi shares golmaal meme get trolled | इथे लोक मरताहेत आणि तुला..., रशिया-युक्रेनवर मीम शेअर करून अर्शद वारसी चांगलाच फसला

इथे लोक मरताहेत आणि तुला..., रशिया-युक्रेनवर मीम शेअर करून अर्शद वारसी चांगलाच फसला

googlenewsNext

Russia Ukraine Crisis : रशिया-युक्रेन युद्धामुळे अख्ख जग चिंतातूर आहे. नव्या जागतिक संकटाची नांदी देणाºया या युद्धावर सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत साऱ्यांनीच चिंता व्यक्त केली आहे. एकीकडे प्रियंका चोप्रा,सोनू सूदपासून अनेक सेलिब्रिटींनी युक्रेनला,तिथे फसलेल्या भारतीयांना मदतीचं आवाहन केलं तर दुसरीकडे अभिनेता अर्शद वारसी (Arshad Warsi ) याने या युद्धावर मीम शेअर केलं. मग काय, अर्शद नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला. लोकांनी त्याला चांगलंच धारेवर धरलं. लोक संतापलेले पाहून अर्शदनं मीम लगेच डिलीट केलं. पण तोपर्यंत त्याचं मीम व्हायरल झालं होतं.

अर्शदने ‘गोलमाल’च्या धर्तीवर हे मीम शेअर केलं होतं. या मीममध्ये त्याने शर्मन जोशीला अमेरिका, स्वत: युक्रेन, अजय देवगण जर्मनी, तुषार कपूर फ्रान्स आणि गुंड हे रशिया असल्याचं दाखवलं होतं. गोलमालचा एक सीन मीममध्ये दाखवला होता. यात अर्शद वारसी रिमीवर लट्टू होत, तिच्याकडे वळतो आणि इकर्ड कर्ज मागणारे गुंड आलेले पाहून अजय देवगण व शर्मन जोशी तिथून पळ काढतात. मग काय शर्मन एकटात गुंडांच्या तावडीत सापडतो. आपल्यासारखीच युक्रेनची स्थिती झालीये, असं सांगण्याचा प्रयत्न अर्शदने या मीममधून केला. पण हे मीम पाहून लोक भडकले.


हा प्रसंग विनोदाचा नाही सर, फारच भावनाशून्य वागणं आहे तुमचं, अशा शब्दांत एका युजरने अर्शदला सुनावलं. ‘युक्रेनच्या लोकांना सहानुभूतीची गरज आहे. बॉलिवूडचा कोणता सिनेमा सुरू नाहीये तिथे,’ अशा शब्दांत एका युजरने आपला संताप व्यक्त केला. लोक मरताहेत आणि तुला विनोद सुचतोय, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली.
अर्शद वारसीच्या कामाबद्दल सांगायचं तर तो लवकरच ‘बच्चन पांडे’ या सिनेमात झळकणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार व क्रिती सॅनन लीड रोलमध्ये आहेत.

Web Title: russia ukraine crisis arshad warsi shares golmaal meme get trolled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.