Sudipto Sen : 'द केरळ स्टोरी'चे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांची प्रकृती अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 11:36 AM2023-05-27T11:36:31+5:302023-05-27T11:41:35+5:30
'द केरळ स्टोरी'चे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांची अचानक तब्येत बिघडली असून त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
'द केरळ स्टोरी' या बहुचर्चित चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्या प्रकृतीबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की 'द केरळ स्टोरी'चे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांची अचानक तब्येत बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रिपोर्टमध्ये सुदीप्तो सेन आजारी पडण्यामागचे कारणही समोर आले आहे.
'द केरळ स्टोरी'चे दिग्दर्शक सुदीप्तो सेन सध्या सतत आपल्या चित्रपटाचे प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. बंदी आणि निषेधाचा सामना करूनही, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. मात्र, जास्त प्रवास आणि
सततच्या प्रमोशनमुळे चित्रपट निर्माते आजारी पडले. होय, बातम्यांनुसार सुदीप्तो सेन यांना वारंवार प्रवास केल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि इतर शहरांमधील कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
रिपोर्ट्सनुसार, सुदीप्तो सेन ठिक बरे झाल्यानंतर 10 शहरांमध्ये केरळ स्टोरीचा प्रमोशन करण्याचा प्लान आहे. अमर उजाल्याच्या रिपोर्टनुसार 'सुदीप्तो सेन 'द केरळ स्टोरी'च्या प्रमोशनसाठी टीमसोबत सतत प्रवास करत आहेत आणि लांबच्या प्रवासामुळे ते आजारी पडले आहेत.
सिनेमाची कथा
अभिनेत्री अदा शर्माने सिनेमा शालिनी उन्नीकृष्णन ही भूमिका साकारली आहे. केरळच्या नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचं पात्र तिने केलं आहे. सिनेमा सत्य घटनेवर आधारित असून मुली लव्हजिहादच्या कशा शिकार होतात आणि नंतर ISIS च्या मार्गाला लागतात हे दाखवलं आहे.