Sushant Singh Rajput Case: 'अखेर मानवता जिंकली!'; 'सर्वोच्च' निकालाचे कंगनाने केले स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 12:44 PM2020-08-19T12:44:51+5:302020-08-19T12:46:14+5:30
अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला दिले आहेत.
अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला दिले आहेत.सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली होती. त्यानंतर आता सोशल मीडियावर सुशांतच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान अभिनेत्री कंगना रानौत हिने देखील सोशल मीडियावर या निर्णयाचे स्वागत केले आहे.
सुशांत सिंग राजपूत आत्महत्येनंतर कंगना रानौत हिने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर निशाणा साधला होता. तसेच ती सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी आवाहन करणारा व्हिडिओ कंगना शेअर करत होती. त्यात आता कंगनाने सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयला करण्याचे आदेश दिल्यानंतर या निर्णयाचे स्वागत केले आहे. तिने ट्विट केले की, मानवता जिंकली. प्रत्येक सुशांत सिंग राजपूत वॉरिअर्सचे अभिनंदन. पहिल्यांदाच इतक्या जणांनी लावलेल्या बळाचे फळ मिळाले. अद्भूत.
Humanity wins, congratulations to each one of SSR warriors, first time I felt such strong force of collective consciousness, AMAZING 👏👏👏#CBITakesOver
— Kangana Ranaut (@KanganaTeam) August 19, 2020
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास पाटणा पोलिसांऐवजी मुंबई पोलिसांकडून करण्यात यावा, अशी याचिका सुशांतची प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीनं केली होती. त्यावर न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला होता. हा निकाल न्यायालयानं आज सुनावला. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा आणि मुंबई पोलिसांनी त्यांना सहकार्य करावं, असं न्यायालयानं निकालात म्हटलं.