The Kashmir Files: 'द काश्मीर फाइल्स' पाहण्यासाठी पोलिसांना मिळणार सुट्टी, 'या' राज्य सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 15:00 IST2022-03-14T15:00:01+5:302022-03-14T15:00:30+5:30
The Kashmir Files: 'द काश्मीर फाइल्स' 11 मार्च रोजी रिलीज झाला असून, देशभरातल याचे शो हाउसफूल होत आहेत.

The Kashmir Files: 'द काश्मीर फाइल्स' पाहण्यासाठी पोलिसांना मिळणार सुट्टी, 'या' राज्य सरकारचा निर्णय
मुंबई: नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाची देशभरात चर्चा सुरू आहे. काश्मिरी पंडितांवरील अत्याचार आणि हत्यांवर आधारित या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर अनेक विक्रम केले आहेत. देशभरातील अनेक राज्यांनी काश्मीर फाइल्स करमुक्त केला आहे. यातच आता मध्य प्रदेश सरकारने हा चित्रपट पाहण्यासाठी पोलिसांना सुट्टी जाहीर केली आहे.
मध्य प्रदेशातील पोलीस कर्मचाऱ्यांना ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहण्यासाठी सुट्टी दिली जाईल, असे मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटले आहे. नरोत्तम मिश्रांनी डीजीपींना निर्देश दिले आहेत की ज्यांना 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट आपल्या कुटुंबासह किंवा एकट्याने पाहायचा असेल, त्यांना सुट्टी देण्यात यावी.
या राज्यांनी चित्रपट करमुक्त केले
कर्नाटक, हरियाणा, गुजरात आणि मध्य प्रदेश सरकारने 'द काश्मीर फाइल्स'ला करमुक्त केला आहे. हा चित्रपट करमुक्त करताना, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले होते की, विवेक अग्निहोत्रीने चित्रपटात अतिशय भयावह आणि हृदयस्पर्शी दृश्ये दाखवली आहेत, त्यामुळे ते कौतुकास पात्र आहेत.
पीएम मोदींनीही कौतुक केले आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे. नुकतीच या चित्रपटाच्या टीमने पीएम मोदींची भेट घेतली. पीएम मोदींची भेट घेतल्यानंतर द काश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी मोदींच्या भेटीचे फोटो शेअर केले होते. 'मला खूप आनंद होत आहे की, अभिषेकने भारताचे हे आव्हानात्मक सत्य दाखवण्याचे धाडस केले. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाबद्दल जगाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी USA मधील #TheKashmirFiles चे स्क्रीनिंग फायदेशीर ठरले,'असे कॅप्शन विवेकने लिहीले.