The Kerala Story: तमिलनाडुत 'द केरळ स्टोरी'चे सर्व शो रद्द, मल्टीप्लेक्स संघटनांनी घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 03:12 PM2023-05-07T15:12:52+5:302023-05-07T15:14:36+5:30

The Kerala Story: 'द केरळ स्टोरी' चित्रपटाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे.

The Kerala Story: All shows of 'The Kerala Story' have been cancelled in Tamil Nadu, multiplex organizations have decided | The Kerala Story: तमिलनाडुत 'द केरळ स्टोरी'चे सर्व शो रद्द, मल्टीप्लेक्स संघटनांनी घेतला निर्णय

The Kerala Story: तमिलनाडुत 'द केरळ स्टोरी'चे सर्व शो रद्द, मल्टीप्लेक्स संघटनांनी घेतला निर्णय

googlenewsNext

The Kerala Story: या शुक्रवारी(दि.5 मे) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या 'द केरळ स्टोरी' चित्रपटाची देशभरात चर्चा आणि वाद होत आहे. अदाह शर्मा स्टारर या चित्रपटात केरळमधील मुलींना धर्मांतर करून ISIS मध्ये सामील करण्यास भाग पाडले जात असल्याची कथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासूनच 'द केरळ स्टोरी'वर बराच वाद झाला असून, यावर बंदी घालण्याची मागणी होत होती.

मात्र, हा चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवरही जोरदार व्यवसाय करत आहे. आतापर्यंत चित्रपटाचे भारतातील कलेक्शन दोन दिवसांत जवळपास 20 कोटी रुपयांवर पोहोचले आहे आणि हा हिट होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पण आता 'द केरळ स्टोरी' पुन्हा एकदा वादात अडकला आहे. तामिळनाडूच्या मल्टिप्लेक्स असोसिएशनने चित्रपटगृहात चित्रपट दाखवण्यास नकार दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तमिळनाडू मल्टिप्लेक्स असोसिएशनने घोषणा केली आहे की 'द केरळ स्टोरी'चे प्रदर्शन रविवारपासून राज्यभरात बंद करण्यात येणार आहे. या निर्णयामागचे कारण स्पष्ट करताना असोसिएशनने म्हटले की, हा चित्रपट 'कायदा आणि सुव्यवस्थेला धोका' ठरू शकतो. यासोबतच या निर्णयामागे सर्वसामान्यांकडून चित्रपटाला मिळालेला थंड प्रतिसाद हेही कारण असल्याचे सांगण्यात आले.

तमिळनाडूतील अनेक राजकीय संघटनांनीही हा चित्रपट कोणत्याही सिनेमागृहात दाखविल्यास ते बंद करण्यात येईल, अशी धमकी दिली आहे. तामिळनाडूच्या नाम तमिलार कच्ची (NTK) पक्षानेही शनिवारी चेन्नईत 'द केरळ स्टोरी'च्या रिलीजला विरोध केला. 'द केरळ स्टोरी' एका विशिष्ट समुदायाच्या विरोधात असल्याचा दावा केला जातोय. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही तामिळनाडू सरकारकडे केली गेली होती.

'द केरळ स्टोरी'च्या ट्रेलरवरून वाद 
चित्रपटाच्या ट्रेलरमधून असा दावा करण्यात आला होता की, केरळमधील 32,000 मुली धर्मांतराला बळी ठरल्या आहेत आणि ISIS मध्ये सामील झाल्या आहेत. या चित्रपटावर बंदी घालण्यासाटी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, पण न्यायालयाने त्यास नकार दिला आणि हा चित्रप प्रदर्शित झाला.
 

Web Title: The Kerala Story: All shows of 'The Kerala Story' have been cancelled in Tamil Nadu, multiplex organizations have decided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.