The Kerala Story: वादात सापडलेला 'द केरळ स्टोरी' बॉक्स ऑफिसवर सुसाट, आठव्या दिवशी केला जबरदस्त बिझनेस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 12:09 PM2023-05-13T12:09:42+5:302023-05-13T12:12:02+5:30

रिलीज झाल्यापासूनच हा सिनेमा वादात सापडला आहे. अनेक राज्यांमध्ये यावर बंदीही घालण्यात आली आहे, तरीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करतो आहे.

The kerala story box office collection day 8 adah sharma starrer movie grows collection amid controversy | The Kerala Story: वादात सापडलेला 'द केरळ स्टोरी' बॉक्स ऑफिसवर सुसाट, आठव्या दिवशी केला जबरदस्त बिझनेस

The Kerala Story: वादात सापडलेला 'द केरळ स्टोरी' बॉक्स ऑफिसवर सुसाट, आठव्या दिवशी केला जबरदस्त बिझनेस

googlenewsNext

The Kerala Story Box Office Collection Day 8: 'द केरळ स्टोरी'  (The Kerala Story)रिलीज झाल्यापासूनच वादात सापडला आहे. अनेक राज्यांमध्ये यावर बंदीही घालण्यात आली आहे, तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला एक आठवडा पूर्ण झाला असून बॉक्स ऑफिसवरील वाटचाल सुसाट सुरु आहे. जाणून घेऊया रिलीजच्या आठव्या दिवशी चित्रपटाने किती कमाई केली.


१०० कोटींच्या कल्बमध्ये होणार एंट्री
सुदीप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाचा वाद शमताना दिसत नाही, तर दुसरीकडे बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवसेंदिवस वाढत आहे. कॉन्ट्रोव्हर्सीचा फायदा 'द केरळ स्टोरी झाला आहे. 'द केरळ स्टोरी'ने वीकेंडला आणि इतर दिवशी चांगला बिझनेस केला आहे. लवकरच हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री करणार आहे. 


द केरळ स्टोरीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
बॉक्स ऑफिस ट्रॅकर सचनिकच्या आकडेवारीनुसार, 'द केरळ स्टोरी'ने आठव्या दिवशी इतर दिवसांपेक्षा जास्त कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने दुसऱ्या शुक्रवारी 12.50 कोटींची कमाई केली आहे. आठ दिवसांत या चित्रपटाने 93.86 कोटींची कमाई केली आहे. शनिवारी चित्रपटाचा आकडा 100 कोटींच्या पुढे जाईल. दुसऱ्या आठवड्यात हा चित्रपट 200 कोटींचा आकडा गाठेल असा अंदाज वर्तवला जात आहे.


काय आहे सिनेमाची कथा?
'द केरळ स्टोरी' हा सिनेमा ३ मुलींची कथा आहे. त्यांचं ब्रेनवॉश केलं जातं आणि धर्मबदल केला जातो. यानंतर त्यांना ISIS च्या हवाली केलं जातं. दरम्यान एक मुलगी निसटून भारतात येते आणि घडलेली सर्व घटना सांगते. त्या मुलीचं पात्र अभिनेत्री अदा शर्माने साकारलं आहे. तिच्या भूमिकेचं विशेष कौतुक होतंय. 
 

Web Title: The kerala story box office collection day 8 adah sharma starrer movie grows collection amid controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.