The Kerala Story: ‘द कश्मीर फाईल्स’नंतर येणार ‘द केरळ स्टोरी’; धर्मांतरावर आधारित चित्रपटाचा टीझर रिलीज...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 11:13 AM2022-03-23T11:13:43+5:302022-03-23T17:56:34+5:30

टीझरमध्ये दाखवण्यात आलेल्या आकडेवारीनुसार केरळमधून 32,000 हून अधिक हिंदू आणि ख्रिश्चन महिलांची तस्करी करुन त्यांना ISIS सारख्या दहशतवादी संघटनांना विकण्यात आले आहे.

'The Kerala Story' teaser released, movie based on women trafficking and Islamic conversion | The Kerala Story: ‘द कश्मीर फाईल्स’नंतर येणार ‘द केरळ स्टोरी’; धर्मांतरावर आधारित चित्रपटाचा टीझर रिलीज...

The Kerala Story: ‘द कश्मीर फाईल्स’नंतर येणार ‘द केरळ स्टोरी’; धर्मांतरावर आधारित चित्रपटाचा टीझर रिलीज...

googlenewsNext

मुंबई: दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्रीने काश्मिरी हिंदूंच्या नरसंहारावर आधारित 'द कश्मीर फाईल्स' चित्रपट बनवला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. या चित्रपटाच्या बंपर यशानंतर आता निर्माते विपुल अमृतलाल शाह अशाच एका गंभीर विषयावरचा चित्रपट घेऊन येत आहेत. 'द केरळ स्टोरी' असे या चित्रपटाचे नाव असून, चित्रपटात केरळमधील हजारो महिलांची तस्करी आणि धर्मांतराची क्रूरता दाखवण्यात येणार आहे. मंगळवारी (22 मार्च) चित्रपटाचा टीझर रिलीज झाला. 

टीझरमध्ये काय आहे?
12 वर्षांच्या काळात केरळमधून हजारो हिंदू आणि ख्रिश्चन महिलांची ISIS आणि जगातील इतर मुस्लिम देशांमध्ये तस्करी आणि बळजबरीने त्यांचे धर्मांतर करण्यात आले होते. त्यावर आधारित हा चित्रपट असून, टीझरच्या सुरुवातीला पडद्यावर एक प्रश्न येतो, ज्यामध्ये प्रेक्षकांना विचारले जाते की जर तुमची मुलगी मध्यरात्री घरी आली नाही तर तुम्हाला कसे वाटेल? यानंतर, केरळमधून 12 वर्षात हजारो मुली गायब झाल्या आहेत आणि अद्याप त्यांच्या घरी परतल्या नाहीत, असे सांगण्यात येते.

चित्रपटाचा टीझर पाहा:-

32 हजार महिलांची तस्करी...
त्यानंतर 2006 ते 2011 पर्यंत केरळचे मुख्यमंत्री राहिलेले व्ही.एस. अच्युतानंदन यांचा एक व्हिडिओ दाखवण्यात येतो. त्यात ते म्हणतात, "पॉप्युलर फ्रंटचा केरळला इस्लामिक राज्य बनवण्याचा मानस आहे. बंदी घातलेल्या NDF प्रमाणेच, पुढील 20 वर्षांत केरळचे मुस्लिम राज्यात रूपांतर करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे." टीझरमध्ये दाखवण्यात आलेल्या आकडेवारीनुसार केरळमधून 32,000 हून अधिक महिलांची तस्करी करुन ISIS या दहशतवादी संघटनेला विकण्यात आल्या आहेत. 'द केरळ स्टोरी'चे लेखक सुदिप्ता सेन असून तेच या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

तस्करी करुन महिलांना 'सेक्स स्लेव्ह' बनवले
दिग्दर्शक सुदिप्तो सेन म्हणाले, "अलीकडेच एका अहवालातून समोर आले आहे की, सन 2009 पासून केरळमधील सुमारे 32000 मुलींचे हिंदू आणि ख्रिश्चनमधून इस्लाम धर्मात धर्मांत करण्यात आले आहे. त्यापैकी बहुतेक महिला सीरिया, अफगाणिस्तान आणि इतर ISIS मध्ये पाठवण्यात आल्या.'' सुदीप्तोने सांगितल्यानुसार, त्याने या चित्रपटापूर्वी या विषयावर खूप संशोधन केले आहे. संशोधनादरम्यान त्याला असेही कळाले की, अपहरण आणि तस्करीच्या माध्यमातून बेपत्ता झालेल्या काही मुली अफगाणिस्तान आणि सीरियातील तुरुंगात सापडल्या आहेत. यातील बहुतांश मुलींचे ISIS च्या दहशतवाद्यांशी लग्न लावून त्यांना 'सेक्स स्लेव्ह' बनवण्यात आले होते.

Web Title: 'The Kerala Story' teaser released, movie based on women trafficking and Islamic conversion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.