अनेक वादांनंतर ब्रिटनमध्येही पडद्यावर झळकणार 'द केरळ स्टोरी"; दिग्दर्शक म्हणाले- दहशतवाद हरला...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 07:45 PM2023-05-17T19:45:17+5:302023-05-17T20:22:15+5:30
यापूर्वी हाऊसफुल्ल शो असूनही परदेशात त्याचे प्रदर्शन रद्द करण्यात आले होते.
'द केरळ स्टोरी'ने 12 दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर सुमारे 150 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अखेर तो यूकेमध्येही प्रदर्शित होत आहे. यापूर्वी हाऊसफुल्ल शो असूनही परदेशात त्याचे प्रदर्शन रद्द करण्यात आले होते. कारण ब्रिटनच्या सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला रिलीज प्रमाणपत्र दिले नव्हते. सुदीप्तो सेन दिग्दर्शित केरळ स्टोरी याआधी १२ मे रोजी यूकेमध्ये रिलीज होणार होती. पण ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशनने (बीबीएफसी) त्याला प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. पण आता तो लवकरच ब्रिटनमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती खुद्द दिग्दर्शकानेच ट्विटवर दिली आहे.
'द केरळ स्टोरी'चे दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी ट्विटरवर आपला भारतीय ब्लॉकबस्टर चित्रपट यूकेमध्ये रिलीज होणार असल्याचे सांगितलं आहे. त्यांनी ट्विट केले, 'अभिनंदन ग्रेट ब्रिटन. तू जिंकलास. दहशतवाद हरला आहे. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे. ... आता ब्रिटीश लोक दहशतवादाविरुद्धची सर्वात मोठी क्रांती पाहतील... #TheKeralaStory'
सुदीप्तो सेनचे यांचं हे ट्विट चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अदा शर्मानेही रिट्विट केले आहे. ती लिहिते, 'तुम्हा सर्वांचे अभिनंदन! यूके मध्ये भेटू #TheKeralaStory'
Congrats all of you ❤️❤️ see you in UK #TheKeralaStoryhttps://t.co/iAQJW7GQNT
— Adah Sharma (@adah_sharma) May 16, 2023
5 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता, पण पश्चिम बंगाल सरकारने राज्यात चित्रपटावर बंदी घातली. तसेच, तामिळनाडूतील चित्रपटगृहांमध्येही हा दाखवला जात नाहीये.
काय आहे सिनेमाची कथा?
'द केरळ स्टोरी' हा सिनेमा ३ मुलींची कथा आहे. त्यांचं ब्रेनवॉश केलं जातं आणि धर्मबदल केला जातो. यानंतर त्यांना ISIS च्या हवाली केलं जातं. दरम्यान एक मुलगी निसटून भारतात येते आणि घडलेली सर्व घटना सांगते. त्या मुलीचं पात्र अभिनेत्री अदा शर्माने साकारलं आहे. तिच्या भूमिकेचं विशेष कौतुक होतंय.