शेर शिवराज'च्या दिग्दर्शकावर संपातले अमोल कोल्हे, दिग्पाल लांजेकरांनी मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 02:36 PM2022-04-30T14:36:44+5:302022-04-30T14:55:17+5:30

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांचा ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतो आहे.

Dr amol kolhe angry on sher shivraj director facebook post Digpal Lanjekar immediately apologized | शेर शिवराज'च्या दिग्दर्शकावर संपातले अमोल कोल्हे, दिग्पाल लांजेकरांनी मागितली माफी

शेर शिवराज'च्या दिग्दर्शकावर संपातले अमोल कोल्हे, दिग्पाल लांजेकरांनी मागितली माफी

googlenewsNext

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांचा ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतो आहे. या सिनेमा संदर्भात एक पोस्ट दिग्पाल लांजेकर यांच्या फेसबुक आऊंटवर शेअर करण्यात आली होती. यावर डॉ. अमोल कोल्हे यांनी आक्षेप घेतलाय. त्यांनी व्हिडीओ शेअर करत आपला आक्षेप नोंदवला आहे. हा व्हिडीओ पाहून आता दिग्पाल लांजेकर यांनी देखील त्यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून माफी मागितली आहे.

नेमक काय आहे वाद?
 काही दिवसांपूर्वी दिग्पाल लांजेकरांनी फेसबुक अकाऊंटवरून त्यांच्या 'शेर शिवराज है' सिनेमाशी संबंधित एक पोस्ट शेअर केली. ही पोस्ट त्यांच्या एका चाहत्यानं लिहिली होती. यात याच पोस्टमध्ये डॉ. अमोल कोल्हेंबाबत सदर पोस्टकर्त्यानं लिहिलं होतं की, "टीव्हीच्या पडद्यावर शिवराय आणि शंभूराजे म्हणजे मीच अशी कोल्हेकुई बंद करून शेर शिवराज हे असे असतात हे सिद्ध करणारा चिन्मय मांडलेकरांचा जबरदस्त अभिनय असलेला सिनेमा."

काय म्हणाले डॉ. अमोल कोल्हे?
आपल्या नाराजीचा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये डॉ. अमोल कोल्हे यांनी लिहिलं,  आजवर प्रत्येकवेळी छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना मी कायमच त्या थोर व्यक्तिरेखांना नतमस्तक होत प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तसेच प्रत्येकाच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मान ठेवून इतरांच्या सादरीकरणावर कधीही भाष्य केले नाही उलट कौतुकच केले.. असे असताना ‘अशा’ प्रकारची पोस्ट लिहिणाऱ्यांचे व ती शेअर करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार!


दिग्पाल लांजेकरांनी मागितली माफी
डॉ. अमोल कोल्हेंच्या या नाराजीनंतर दिग्पाल लांजेकरांनीही 'मनापासून दिलगिरी' व्यक्त करत त्यांची माफीही मागितलीय. आताच माननीय खासदार श्री अमोलजी कोल्हे यांची एक पोस्ट माझ्या बघण्यात आली. माझ्या फेसबुक वॉलवर झालेल्या एक पोस्ट संदर्भात ते बोलत होते. ही जी पोस्ट आहे ती माझ्या एका चाहत्यानं केली होती. अनेक चाहते शेर शिवराजच्या प्रदर्शनानंतर भराभरा पोस्ट करत होते टॅग करते होते. त्यात अनावधानाने सोशल मीडिया टीमकडून ही पोस्ट रिपोस्ट केली गेली. पहिल्या काही ओळी वाचून ती टाकण्यात आली. नंतर लगेच लक्षात आलं अशा पद्धतीचे काही तरी म्हटलं गेलंय तेव्हा ती पोस्ट काही मिनिटात काढण्यात आली.

Web Title: Dr amol kolhe angry on sher shivraj director facebook post Digpal Lanjekar immediately apologized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.