'इमर्जन्सी' चित्रपटावर राहुल गांधींची काय प्रतिक्रिया असेल ? कंगना राणौत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 12:56 PM2024-09-01T12:56:09+5:302024-09-01T12:57:06+5:30
'इमर्जन्सी' चित्रपट आणीबाणी आणि भारताच्या माजी पंतप्रधान व राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी यांच्या जीवनावर बेतलेला आहे.
खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) आगामी 'इमर्जन्सी' (Emergency) सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे. यामध्ये कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिकेत साकारत आहे. इंदिरा गांधींनी लावलेला इमर्जन्सीचा भयानक काळ सिनेमामध्ये दाखवण्यात आला आहे. पण, सिनेमाच्या रिलीजला अवघे काहीच दिवस बाकी असताना मोठा वाद निर्माण झालाय. 'इमर्जन्सी' सिनेमाचं सेन्सॉर सर्टिफिकेट थांबवण्यात आलंंय. अशातचं 'इमर्जन्सी' चित्रपटासंदर्भात राहुल गांधींबद्दल विचारलेल्या प्रश्नावर कंगना राणौतने दिलेल्या उत्तराची चर्चा आहे.
'इमर्जन्सी' चित्रपट आणीबाणी आणि भारताच्या माजी पंतप्रधान व राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी यांच्या जीवनावर बेतलेला आहे. नुकतंच कंगना ही रजत शर्मा यांच्या 'आप की अदालत' या शोमध्ये सहभागी झाली. याचा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये कंगनाला 'इमर्जन्सी' चित्रपटावर राहुल गांधींची काय प्रतिक्रिया असेल असा प्रश्न विचारण्यात आला. यावर कंगना म्हणाली, "जर ते घरी जाऊन टॉम अँड जेरी कार्टून पाहत असतील तर त्यांना माझा चित्रपट कसा समजेल".
कंगना सिर्फ.. अपनी फिल्म इंडस्ट्री के बारे में चौंकाने वाली बातें कहती हैं..
— Rajat Sharma (@RajatSharmaLive) August 31, 2024
वो फिल्म इंडस्ट्री को झूठा कहती हैं, फेक बताती हैं..
फिल्म इंडस्ट्री के लोगों को पागल और बेवकूफ कहती हैं..
इसपर उनसे सफाई मांगी गई, तो जो जवाब मिले, वो और भी विस्फोटक थे.
कंगना ने करन जौहर, रणबीर कपूर,… pic.twitter.com/7W8pCaqO1K
यापुर्वी कंगनाने 'मॅशेबल इंडिया'ला मुलाखत दिली होती. यामध्येही राहुल गांधी आणि इंदिरा गांधींबद्दल बोलताना कंगना म्हणाली की, "इंदिरा गांधी यांच्यावरील बायोपिक करणं खूप अवघड होतं. इंदिरा गांधी यांचं आयुष्य हे खूप चढ-उतारांनी भरलेलं होतं. त्यांची सर्व माहिती घेण्याचे सर्व अधिकार माझ्याकडे होते. पुपुल जयकर यांनी लिहिलेलं 'इंदिरा गांधी: जीवनचरित्र' हे राजीव गांधी यांनी लाँच केले होते. त्यावरच हा चित्रपट केला आहे. त्यामुळे राहुल गांधींना हा बायोपिक पाहून खूप आनंद होईल, किंबहुना त्यांना हा चित्रपट पाहून अभिमान वाटेल, असं मला वाटतं".
'इमर्जन्सी' सिनेमात अभिनेता श्रेयस तळपदे अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेत आहे तर अनुपम खेर जयप्रकाश नारायण यांची भूमिका साकारत आहेत. सतीश कौशिक, मिलिंद सोमण, भूमिका चावला यांचीही भूमिका आहे. मिलिंद सोमणने सॅम माणिकशॉ यांची भूमिका साकारली आहे. सिनेमाच्या ट्रेलर आणि आता गाण्यानंतर प्रेक्षक सिनेमा पाहण्यासाठी आतुर झालेत. कंगना सध्या अनेक मुलाखतींमधून सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे.