"कृपा करून आम्हाला जगायला...", लोकसभा निवडणुकीनंतर शशांकची पोस्ट, BJP आणि काँग्रेसला केलं टॅग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 01:09 PM2024-06-05T13:09:26+5:302024-06-05T13:09:48+5:30

Loksabha Election Result 2024 : निवडणुक निकालावर शशांक केतकरचं भाष्य, शेअर केली पोस्ट

marathi actor shashank ketkar shared post after loksabha election result 2024 narendra modi and rahul gandhi | "कृपा करून आम्हाला जगायला...", लोकसभा निवडणुकीनंतर शशांकची पोस्ट, BJP आणि काँग्रेसला केलं टॅग

"कृपा करून आम्हाला जगायला...", लोकसभा निवडणुकीनंतर शशांकची पोस्ट, BJP आणि काँग्रेसला केलं टॅग

Loksabha Election Result 2024 : मंगळवारी(४ जून) झालेल्या लोकसभा निवडणुक निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. देशात पुन्हा भाजपाची सत्ता येणार की सत्तापालट होणार? याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता होती. २०२४ च्या निवडणुकीत भाजपाला हवं तसं यश मिळवता आलं नाही. या निवडणुकीत भाजपाला २४० जागांवर तर NDA ला २९२ जागांवर यश मिळवता आलं. तर दुसरीकडे राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसने ९९ आणि IND आघाडीने २३४ जागा मिळाल्या. यानंतर आता NDA आणि IND आघाडीकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. 

देशात पुन्हा NDA चं सरकार येणार असल्याचं आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी विराजमान होणार असल्याचं निवडणुक निकालानंतर साधलेल्या संवादात मोदी म्हणाले. तर दुसरीकडे IND आघाडीही सत्ता स्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत आहे. याबाबत आता मराठमोळा अभिनेता शशांक केतकरने पोस्ट केली आहे. शशांकने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन सोशल मीडियावरील एक पोस्ट शेअर केली आहे. 

या पोस्टमध्ये राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांचा फोटो आणि निवडणुक निकालावर भाष्य केलं आहे. "ही लोकशाही आश्चर्यचकित करणारी आहे...देशातील जनतेने दिलेला हा निर्णय भारतातील राजकारणात कायम लक्षात ठेवला जाईल. त्यांनी NDA ला पराभव भासू देणारं बहुमत दिलं. आणि IND आघाडीचा असा पराभव केला की ते विजयी झाले", असं या पोस्टमध्ये म्हटलं गेलं आहे. 

शशांक केतकरने ही पोस्ट शेअर करत त्याचं मत मांडलं आहे. "कृपा करून आम्हाला जगायला सुरक्षित, प्रगत, स्वच्छ आणि आनंदी देश द्या", असं शशांकने म्हटलं आहे. या पोस्टमध्ये त्याने भाजपा आणि काँग्रेसच्या सोशल मीडिया अकाऊंटलाही टॅग केलं आहे. त्याची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. 

Web Title: marathi actor shashank ketkar shared post after loksabha election result 2024 narendra modi and rahul gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.