'बचेंगे तो और भी लडेंगे...', डॉ. अमोल कोल्हेंची पोस्ट आली चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 03:53 PM2022-07-16T15:53:16+5:302022-07-16T15:53:44+5:30

Dr. Amol Kolhe: डॉ. अमोल कोल्हेंची सोशल मीडियावरील लेटेस्ट पोस्ट चर्चेत आली आहे.

'Bachenge to aur bhi ladenge...', Dr. Amol Kolhe's post came into discussion | 'बचेंगे तो और भी लडेंगे...', डॉ. अमोल कोल्हेंची पोस्ट आली चर्चेत

'बचेंगे तो और भी लडेंगे...', डॉ. अमोल कोल्हेंची पोस्ट आली चर्चेत

googlenewsNext

राजा शिवछत्रपती आणि स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकांनी जगभरात अफाट लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील भूमिकांमुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज म्हटलं की, डॉ. अमोल कोल्हे () यांचेच नाव प्रेक्षकांच्या मनात ठसलं आहे. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कर्तृत्वाची महती सांगणारा 'शिवप्रताप' मालिकेतील 'गरुडझेप' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसंदर्भातील एक पोस्ट अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. यात त्यांनी शूटिंगचा अनुभव सांगितला आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी एक व्हिडीओ शेअर करत लिहिले की, अशा वातावरणात शूटींग करणे म्हणजे वेडेपणा आहे, आग्र्याच्या लाल किल्ल्यात शूटींग? कसं शक्य आहे? अनेकांच्या अनेक शंका.... पण प्रत्यक्ष इतिहास जणू 356 वर्षांनंतर त्या घटनेला कॅमेऱ्याच्या लेन्स मधून पाहणार होता.. ASI नियमावलीचे पालन करता करता होणारी दमछाक, त्यात 38-40 डिग्री असलं तरी 70% आर्द्रतेमुळे 42-44 वाटणारं तापमान ते ही सकाळी 9 वाजता, चुकून टाचणी विसरली तरी किल्ल्यातून base camp पर्यंत पायपीट, ना बसायला खुर्ची ना पंखा.. सावलीसाठी आडोशाला उभं राहावं तर घामाच्या धारा आणि जरा हवेशीर ठिकाणी उभं राहावं तर उन्हाच्या झळा..रोज 4-5 जण अंथरूण धरायचे नाहीतर थेट हॉस्पिटल मध्ये.. तरी पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी ' बचेंगे तो और भी लडेंगे' या ईर्षेने शूटिंग सुरु...


या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, पण यात खरं कौतुक करायला हवं ते आमच्या टीम मधील सेटिंग boys, spot boys, light boys, costume dept, direction team, camera team ani junior artists चं..कारण या सर्व प्रतिकूलतेत ते सर्वजण ठाम होते.. महाराजांच्या पेहरावात मी जेव्हा लाल किल्ल्यात पाऊल ठेवलं तेव्हा भारावलेले, अगदी डोळे भरून तो प्रसंग डोळ्यात साठवणारे आणि 356 वर्षांपूर्वी घडलेल्या इतिहासाच्या पुनर्प्रत्ययाचे ते सर्वजण पहिले साक्षीदार होते...'Strenght of a Chain is judged by the strength of weakest link in the chain' या उक्ती प्रमाणे टीमची ताकद दाखवून देत होते आणि आमचा टीम leader, आमचा दिग्दर्शक कार्तिक केंढे तर पहाडासारखा त्या प्रतिकूलतेच्या छाताडावर पाय ठेवून उभा होता...मला जाणवत होतं की आपापल्या परीने प्रत्येक मावळा लढत होता..आणि प्रत्येकाची प्रेरणा लाल किल्ल्याकडे स्वाभिमानी नजर रोखून ताठ मानेने उभी होती... शतकानुशकं अजरामर प्रेरणा - छत्रपती शिवाजी महाराज!

'जगदंब क्रिएशन' प्रस्तुत करीत असलेल्या डॉ. अमोल रामसिंग कोल्हे निर्मित 'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत स्वतः डॉ. अमोल कोल्हे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Web Title: 'Bachenge to aur bhi ladenge...', Dr. Amol Kolhe's post came into discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.