'जय भवानी जय शिवराय' ‘शिवप्रताप–गरुडझेप’ चित्रपटातील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 04:33 PM2022-08-29T16:33:08+5:302022-08-29T16:46:48+5:30

शिवप्रताप–गरुडझेप या आगामी मराठी चित्रपटातील शिवशक्तीमय गाणं 'जय भवानी जय शिवराय' प्रदर्शित करण्यात आले आहे.

'Jai Bhavani Jai Shivary' song release from the movie 'Shivpratap Garudzep' | 'जय भवानी जय शिवराय' ‘शिवप्रताप–गरुडझेप’ चित्रपटातील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

'जय भवानी जय शिवराय' ‘शिवप्रताप–गरुडझेप’ चित्रपटातील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

googlenewsNext

शिवप्रताप–गरुडझेप या आगामी मराठी चित्रपटातील शिवशक्तीमय गाणं 'जय भवानी जय शिवराय' प्रदर्शित करण्यात आले आहे. प्रत्येकाच्या मनात जोश, उत्साह निर्माण करणाऱ्या या गीताचे बोल हृषिकेश परांजपे यांनी लिहिले असून गायक आदर्श शिंदे यांच्या ठसकेबाज आवाजात ते स्वरबद्ध करण्यात आलं आहे. शशांक पोवार यांचे संगीत या गीताला लाभले आहे.

‘स्वराज्याच्या चळवळीला गती देणारा हा लोकोत्सव, स्वराज्याचे सुराज्य करण्याच्या प्रयत्नांना पूरक कसा ठरू शकेल याचा विचार आता करण्याची गरज निर्माण झाली असून या शिवशक्तीमय गीतातून ही भावना जागृत होण्यास मदत होईल’, असा विश्वास अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला. या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांची अटक, औरंगजेबाच्या दरबारातील बाणेदार प्रसंगाबरोबरच आपल्या बुद्धिचातुर्याने तेथून करून घेतलेली सुटका हा सगळा शौर्याचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत डॉ. अमोल कोल्हे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्यासाठी सज्ज झाले आहेत.

डॉ. अमोल रामसिंग कोल्हे, विलास सावंत, सोनाली घनश्याम राव, चंद्रशेखर ढवळीकर,कार्तिक राजाराम केंढे यांची निर्मिती असलेल्या 'शिवप्रताप - गरुडझेप' या चित्रपटाचं दिग्दर्शन कार्तिक केंढे यांनी केलं आहे.अमोल कोल्हेंसोबत यतीन कार्येकर, प्रतीक्षा लोणकर, हरक अमोल भारतीय, शैलेश दातार, हरीश दुधाडे, मनवा नाईक, पल्लवी वैद्य, अजय तपकिरे, रमेश रोकडे, अलका बडोला कौशल, आदी ईराणी, विश्वजीत फडते आदी कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.

Web Title: 'Jai Bhavani Jai Shivary' song release from the movie 'Shivpratap Garudzep'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.