'स्वराज्य रक्षक संभाजी' घेणार आज प्रेक्षकांचा निरोप, अमोल कोल्हे झाले भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 02:08 PM2020-02-29T14:08:19+5:302020-02-29T14:11:17+5:30
Swarajyarakshak Sambhaji Serial : वाचून तुमचे ही डोळे पाणावतील.
अल्पावधीत लोकप्रिय झालेली झी मराठीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' ही मालिका आज प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार ही बातमी सर्वात आधी आम्हीच तुम्हाला दिली होती. मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होण्याआधी संभाजी मालिकेच्या संपूर्ण टीमने पुण्याजवळच्या वढू इथं जाऊन संभाजी राजेंच्या समाधीचे जाऊन दर्शन घेतले. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषेदेदरम्यान मालिकेत संभाजी राजेंची भूमिका साकारणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांना अश्रू अनावर झाले होते. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांच्या डोळ्यात पाणी पाहायला मिळाले.
आज प्रसारित होणाऱ्या शेवटच्या भाग पाहून प्रेक्षकांचे डोळे पाणावणार आहेत. तसेच 'स्वराज्य रक्षक संभाजी'च्या टीमने घेतलेले समाधीचे दर्शन देखील दाखवणार आहेत.
मध्यतंरी संभाजी महाराजांच्या अटकेनंतरचे हाल शिवप्रेमी पाहू शकत नाही त्यामुळे मालिकेतील चित्रीकरण थांबवा अशी मागणी शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केली आहे होती. त्यानंतर अमोल कोल्हे यावर स्पष्टीकरण देताना म्हणाले होते की, यांनी मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाले असून काय दाखवायचे, काय वगळायचे हा निर्णय सर्वस्वी झी मराठी वाहिनीचा असेल, मालिकेत बदल केल्याबाबत जे वृत्त छापलं ते धादांत खोटं आहे. आवश्यक खबरदारी घेऊन मालिकेचे चित्रीकरण केले आहे. कोणताही भाग वगळावा अन्यथा नाही तो अधिकार निर्मात्याचा नाही तर झी मराठी वाहिनीचा आहे असं ते म्हणाले होते.
संभाजी मालिका नेहमीच टीआरपीच्या रेसमध्ये अव्वल स्थानावर राहिली. डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली संभाजी महाराज यांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. संभाजी प्रमाणेच शंतून मोघेने साकारलेली शिवाजी महाराजांची भूमिका प्राजक्ता गायकवाड साकारत असलेली येसूबाईंची भूमिकेला ही प्रेक्षकांचे प्रेम मिळाले.