सैफसोबत लग्न करण्यापूर्वी बेबोचा या प्रसिद्ध नेत्यावर जडला होता जीव, करीनाला करायचं होतं डेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 09:37 IST2025-03-24T09:31:14+5:302025-03-24T09:37:27+5:30
Kareena Kapoor : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर करीना कपूर सैफ अली खानच्या संपर्कात आली. त्यांच्या लग्नाला बरीच वर्षे उलटून गेली आहेत. तिला तैमूर आणि जेह नावाची दोन मुलं आहेत, पण बेबोला आवडणाऱ्या राजकीय नेत्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. अभिनेत्रीने एकदा त्याच्यावर असलेल्या तिच्या क्रशबद्दल सांगितले होते.

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर करीना कपूर सैफ अली खानच्या संपर्कात आली. त्यांच्या लग्नाला बरीच वर्षे उलटून गेली आहेत. तिला तैमूर आणि जेह नावाची दोन मुलं आहेत, पण बेबोला आवडणाऱ्या राजकीय नेत्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. अभिनेत्रीने एकदा त्याच्यावर असलेल्या तिच्या क्रशबद्दल सांगितले.
बॉलिवूडची बेबो करीना कपूरचे वैयक्तिक आयुष्य तिच्या चित्रपट कारकिर्दी इतकेच सुपरहिट आहे. आज ती बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आहे, पण तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला ती तिची बहीण करिश्मा कपूरच्या स्टारडमला कधी टच करू शकेल असे वाटत नव्हते. अभिनेत्रीचे स्टारडम जसजसे वाढत गेले, तसतसे तिच्या अफेअरचे किस्सेही जगजाहीर झाले.
शाहिद कपूरसोबतचा करीनाचा रोमान्स काही वर्षांपासून चर्चेत होता. करीना कपूरच्या करिअरमध्ये एक काळ असा होता जेव्हा तिला एका प्रसिद्ध नेत्याला डेट करायचे होते.
जेव्हा करीनाला विचारण्यात आले की, जर तिला जगातील कोणाला डेट करण्याची संधी मिळाली तर ती कोणाची निवड करेल? यावर करीना म्हणाली होती की, 'मी सांगू की नाही, पण हे जरा वादग्रस्त आहे. मला राहुल गांधींना डेट करायला आवडेल.
त्यानंतर करीनाने राहुल गांधींना डेट करण्याच्या इच्छेचे कारण स्पष्ट केले, 'मी त्यांचे फोटो पाहत राहते आणि विचार करते की त्यांना जाणून घेणे किती मनोरंजक असेल. मी सिने कुटुंबातून आले आहे आणि तो राजकीय कुटुंबातून आला आहे, त्यामुळे कदाचित हे एक मनोरंजक संभाषण असेल.
करीना कपूर त्यावेळी सिनेइंडस्ट्रीत नवीन होती, जेव्हा तिने प्रसिद्ध नेते राहुल गांधी यांना डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. 'रेंडीवू विथ सिमी ग्रेवाल' या शोच्या जुन्या एपिसोडमध्ये करीना कपूरने सांगितले होते की, तिला राहुल गांधींना भेटायला आवडेल कारण दोघेही एका खास वंशातील आहेत.
अनेक वर्षांनंतर, जेव्हा करीनाला तिच्या डेटिंग कमेंटबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली, 'हे खूप जुने आहे. आमची आडनावे प्रसिद्ध आहेत म्हणून मी हे बोलले होते.
करीनाने अनेक वर्षे शाहिद कपूरला डेट केले, पण २००७ मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. यानंतर करीना 'टशन' चित्रपटाच्या सेटवर सैफ अली खानला भेटली आणि ती त्याच्या प्रेमात पडली.
करीना-सैफचे अखेर २०१२ मध्ये लग्न झाले आणि आता त्यांना दोन मुले आहेत - जहांगीर अली खान आणि तैमूर अली खान.