विकी कौशल ते अमोल कोल्हे...; 'या' कलाकारांनी साकारलेले शंभूराजे प्रेक्षकांना भावले, तुमचा फेव्हरेट कोण?

By कोमल खांबे | Updated: February 19, 2025 18:09 IST2025-02-19T17:52:41+5:302025-02-19T18:09:37+5:30

विकी कौशलच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुकही होत आहे. विकी कौशलच्या आधीही अनेक कलाकारांनी शंभूराजेंची भूमिका साकारली.

विकी कौशलच्या 'छावा' सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा या सिनेमातून दाखविण्यात आली आहे.

या सिनेमात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.

विकी कौशलच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुकही होत आहे. विकी कौशलच्या आधीही अनेक कलाकारांनी शंभूराजेंची भूमिका साकारली.

अभिनेता आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती.

त्यांनी साकारलेले संभाजी महाराज प्रेक्षकांच्या मनावर कोरले गेले होते.

'सरसेनापती हंबीरराव' या सिनेमात अभिनेता गश्मीर महाजनी संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसला होता.

गश्मीरने या सिनेमात संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज अशी दुहेरी भूमिका साकारली होती.

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'शिवरायांचा छावा' सिनेमातून छत्रपती शंभूराजेंचा इतिहास दाखविण्यात आला होता.

या सिनेमात अभिनेता भूषण पाटील याने संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती.

'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज' या मराठी सिनेमाची प्रचंड चर्चा होती.

या सिनेमात अनुप सिंग ठाकूरने साकारलेली संभाजी महाराजांची भूमिका प्रेक्षकांना आवडली होती.