डॉ. अमोल कोल्हे ते शरद केळकर; 'या' कलाकारांनी गाजवली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका
By देवेंद्र जाधव | Updated: February 19, 2025 11:30 IST2025-02-19T10:29:50+5:302025-02-19T11:30:28+5:30
आज शिवजयंती. त्यानिमित्ताने छत्रपती शिवरायांची भूमिका आजवर कोणत्या कलाकारांनी साकारली, जाणून घेऊ

डॉ. अमोल कोल्हे यांना 'राजा शिवछत्रपती' मालिकेत साकारलेली छत्रपती शिवरायांची भूमिका चांगलीच गाजली. त्यानंतरही अमोल कोल्हे यांनी अनेक मालिका, सिनेमांमध्ये छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली.
अक्षय कुमार आगामी 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. अक्षयचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला.
'तान्हाजी' सिनेमातील शरद केळकरचा पहिला लूक जेव्हा समोर आला तेव्हाच चाहत्यांना आणि शिवप्रेमींना हा लूक चांगलाच आवडला. शरद केळकरने साकारलेली छत्रपती शिवरायांची भूमिका चांगलीच गाजली.
दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित शिवराज अष्टक सिनेमातील आजवरच्या सर्व सिनेमांमध्ये चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत अभिनेता शंतनु मोघेने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. ही भूमिकाही चाहत्यांच्या पसंतीस उतरली.
भालजी पेंढारकर दिग्दर्शित 'छत्रपती शिवाजी' या सिनेमात अभिनेते चंद्रकांत मांढरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. मराठी सिनेसृष्टीत चंद्रकांत मांढरे यांनी पहिल्यांदा छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली होती.
'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या सिनेमात महेश मांजरेकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. ही भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.