Photos: सेलिब्रेशन नकोच! Uttarakhandमधील 'या' हिल स्टेशनवर दीप-वीरने एकांतात साजरा केला लग्नाचा वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 12:45 PM2021-11-18T12:45:00+5:302021-11-18T12:45:00+5:30

Ranveer And Deepika: दीप-वीरने २०१८ मध्ये इटलीतील लेक कोमो येथे जवळपास ७०० वर्ष जुन्या डेल बालबियानेलो या व्हिलामध्ये कोंकणी आणि सिंधी पद्धतीने लग्न केलं.

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणजे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह. सोशल मीडियावर कायम चर्चेत राहणाऱ्या या जोडीने अलिकडेच त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला.

१४ नोव्हेंबर २०१८ मध्ये दीप-वीरचा मोठ्या थाटात इटलीमध्ये लग्नसोहळा पार पडला. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या लग्नाची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली होती.

रविवारी, १४ नोव्हेंबरला या जोडीच्या लग्नाला ३ वर्ष पूर्ण झाले. या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये या दोघांचंही एकमेकांवर असलेलं प्रेम चाहत्यांनी पाहिलं आहे. रणवीरचं दीपिकावर प्रचंड प्रेम असून अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून तो त्याचं प्रेम व्यक्त करत असतो.

अलिकडेच या दोघांनी त्यांची अॅनिव्हर्सरी उत्तराखंडमध्ये सेलिब्रेट केली. यावेळचे काही खास फोटो रणवीरने त्याच्या फेसबुक पेजवर शेअर केले आहेत. तर दीपिकानेही तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

दीप-वीरने शेअर केलेले फोटो पाहून अनेकांना हे ठिकाण नेमकं कुठे आहे असा प्रश्न पडला होता. विशेष म्हणजे या दोघांनीही अॅनिव्हर्सरीसाठी उत्तराखंडमधील एका सुंदर जागेची निवड केली होती.

या दोघांनीही उत्तराखंडमधील Almora येथील बिनसर येथे त्यांची अॅनिव्हर्सरी साजरी केली. निसर्गाच्या सानिध्यात हे ठिकाण असून रोजच्या दगदगीतून या दोघांनी वेळ काढत ही जागा निवडली.

बिनसर येथील मॅरी बटन रिजॉर्ट येथे ही जोडी थांबली होती. या रिजॉर्टवरील काही फोटो दोघांनीही शेअर केले आहेत.

रविवारी बिनसरमध्ये गेलेली ही जोडी मंगळवारी दुपारी ३.३० वाजता पुन्हा मुंबईत परतले. विशेष म्हणजे कोणत्याही केक वा अन्य सेलिब्रेशनशिवाय या दोघांनी वाढदिवस साजरा केल्याचं म्हटलं जात आहे.

दीप-वीरने २०१८ मध्ये इटलीतील लेक कोमो येथे जवळपास ७०० वर्ष जुन्या डेल बालबियानेलो या व्हिलामध्ये कोंकणी आणि सिंधी पद्धतीने लग्न केलं.