रवीना टंडनचे वाहन वाघाजवळ? वाघांच्या सुरक्षेचा मुद्दा व्हिडिओतून समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 06:17 AM2022-11-30T06:17:11+5:302022-11-30T06:17:47+5:30

व्हिडीओ समोर आल्यानंतर चौकशी सुरू

Raveena Tandon's vehicle near the tiger? The issue of safety of tigers is exposed in the video | रवीना टंडनचे वाहन वाघाजवळ? वाघांच्या सुरक्षेचा मुद्दा व्हिडिओतून समोर

रवीना टंडनचे वाहन वाघाजवळ? वाघांच्या सुरक्षेचा मुद्दा व्हिडिओतून समोर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नर्मदापुरम (मध्य प्रदेश) : सातपुडा व्याघ्र प्रकल्पातील प्रवासादरम्यान बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन यांचे वाहन वाघाच्या जवळ असल्याचे एका व्हिडीओत दिसून आल्यानंतर व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. सोशल मीडियातील एका व्हिडीओमध्ये हे वाहन वाघाच्या जवळ जाताना दिसले. मध्य प्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्पातील ही घटना आहे. कॅमेऱ्याचा आवाज या व्हिडीओत ऐकू येत आहे. तर वाघ त्यांच्याकडे पाहून डरकाळी फोडत असल्याचे दिसत आहे. 

हा व्हिडीओ रवीना टंडन यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. वनविभागाचे उपविभागीय अधिकारी धीरज सिंह चौहान यांनी मंगळवारी सांगितले की, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दि. २२ नोव्हेंबर रोजी रवीना टंडन यांनी या भागाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांचे वाहन वाघाजवळ पोहोचले. वाहनचालक आणि तेथील अधिकारी यांना नोटीस पाठवून चौकशी केली जाईल. चौकशी अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे. 

रवीना टंडन यांचे काय होेते ट्वीट 
व्याघ्र प्रकल्पातील वाघांची छायाचित्रे रविना टंडन यांनी सोशल मीडियावर शेअर केली होती. रविना यांनी ट्विट केले होते की, वनविहार, भोपाळ, मध्य प्रदेश. काही पर्यटक वाघावर दगडफेक करतात. असे करू नका सांगितल्यावर हसतात. पिंजरा हलवितात आणि आणखी दगड फेकतात. वाघांची कोणतीही सुरक्षा नाही, ही तर वाघांची फटफजिती आहे.

Web Title: Raveena Tandon's vehicle near the tiger? The issue of safety of tigers is exposed in the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.