Live Show सुरू असताना अचानक अभिनेत्रीचा झाला मृत्यू; भयंकर दृश्य कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 05:53 PM2023-11-23T17:53:52+5:302023-11-23T17:54:25+5:30
रशिया समर्थन टेलिग्राम चॅनेलवर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात पोलिनो मेन्शिख गिटारसोबत मंचावर गाणं गाताना दिसते.
रशिया आणि यूक्रेन यांच्यातील दिर्घकालीन युद्ध संपण्याचं चिन्ह अद्याप दिसत नाही. जवळपास २ वर्ष सुरू असलेल्या या युद्धात आता एका अभिनेत्रीचा जीव गेला आहे. ही भयानक घटना लाईव्ह शो मध्ये घडली आणि कॅमेऱ्यात कैद झाले. पूर्व युक्रेनमधील रशियन-नियंत्रित भागात रशियन सैन्यासाठी परफॉर्म करताना युक्रेनच्या हल्ल्यात रशियन अभिनेत्री पोलिना मेन्शिख मृत्यू झाला आहे.
१९ नोव्हेंबरला युक्रेनवर हल्ला झाला
रशियन थिएटरनं दिलेल्या माहितीनुसार, ४० वर्षीय पोलिना मेन्शिख ही अभिनेत्री रशियन थिएटरमध्ये काम करत होती. डॉनबास प्रदेशात स्टेजवर परफॉर्म करत असताना तिची हत्या करण्यात आली. रॉयटर्स या घटनेच्या तपशीलाची पुष्टी करू शकले नाहीत परंतु दोन्ही बाजूंच्या लष्करी अधिकाऱ्यांनी १९ नोव्हेंबर रोजी या भागात युक्रेनियन हल्ला झाला होता असं पुष्टी केली आहे.
JUST IN: Russian actress Polina Menshikh was killed by a Ukrainian missile while performing for Russian marines.
— Collin Rugg (@CollinRugg) November 22, 2023
The incident happened in the village of Kumachovo which is 40 miles from the front lines.
The strike was conducted by the Ukrainian military using a US-supplied… pic.twitter.com/7xNtawpBzT
रशियन सरकारी टेलिव्हिजनमध्ये एका रशियन सैनिकाने सांगितले की, डोनेस्तक प्रदेशातील एका गावात शाळा आणि सांस्कृतिक केंद्रावर HIMARS मिसाईलद्वारे हल्ला करण्यात आला. ज्याला कुमाचोवो म्हटलं जाते आणि युक्रेनियन कुमाचोवे नावानं ओळखतात. हे मुख्य सीमेपासून ६० किमी (३७ मैल) अंतरावर आहे. तर एका नागरिकाने त्याला माहिती दिली की लष्करी जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.रशियन संरक्षण मंत्रालयाने भाष्य करण्यास नकार दिला आणि या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे नमूद केले असं त्यांनी म्हटलं आहे.
व्हिडिओ होतोय व्हायरल
रशिया समर्थन टेलिग्राम चॅनेलवर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात पोलिनो मेन्शिख गिटारसोबत मंचावर गाणं गाताना दिसते. त्यादिवशी रशियन सैन्याचा कार्यक्रम सुरू होता. गाणे सुरू असतानाच अचानक इमारत स्फोटाने हादरते. वीज गायब होते. खिडक्या तुटतात हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले. अभिनेत्रीसह काही नौदल सैनिकांचा देखील युक्रेनच्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला. यासोबतच कॉन्सर्ट हॉलमध्ये झालेल्या या हल्ल्यात जवळपास १०० लोक जखमी झाले आहेत. मात्र, या हल्ल्यात एकूण किती लोक मारले गेले याची अद्याप पुष्टी झालेली नाही.