Kerala Wayanad Landslide : आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी धावले सुपरस्टार, अल्लू अर्जुन, राम चरण ते चिरंजीवीपर्यंत कोणी किती केली मदत?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 05:22 PM2024-08-04T17:22:06+5:302024-08-04T17:23:08+5:30
वायनाडच्या मदतीला अवघी दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्री धावून आली आहे.
Kerala Wayanad Landslide : केरळमधीलवायनाड जिल्ह्यामध्ये दरडी कोसळून मरण पावलेल्यांची संख्या २१८ वर पोहोचली आहे, तसेच २०६ जण अद्याप बेपत्ता आहेत. या भूस्खलनामुळे अनेक घरे, जीव ढिगार्याखाली गाडले गेले. अनेक लोकांचा मृत्यू झाला तर काही लोक जखमी आहे. गेल्या आठवडाभरापासून बचाव पथकाची शोधमोहीम सुरू आहे. शनिवारी सुपरस्टार मोहनलाल यांनी वायनाडमधील प्रभावित भागांना भेट देऊन 3 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. आता रविवारी सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) , राम चरण (Ram Charan) आणि चिरंजीवी (Chiranjeevi) यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.
अल्लू अर्जुननेकेरळच्या सीएम रिलीफ फंडात २५ लाख रुपयांची देणगी दिली आहे. अभिनेत्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना याबद्दल माहिती दिली आहे. त्याने लिहलं, 'वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलन घटना पाहून मी खूप दुःखी आहे. केरळने नेहमीच माझ्यावर खूप प्रेम केले आहे. केरळच्या मुख्यमंत्री मदत निधीमध्ये २५ लाख रुपये देणगी देत पुनर्वसन कार्यात माझा खारीचा वाट उचलण्याचा प्रयत्न आहे'.
मोहनलाल आणि अल्लू अर्जूननंतर दक्षिणेतील मेगास्टार चिरंजीवी आणि त्याचा अभिनेता-मुलगा राम चरण यांनी मिळून १ कोटी रुपये मुख्यमंत्री मदत निधीमध्ये दिले आहेत. चिरंजीवी आणि राम चरणने पीडितांना मदत करत त्यांच्यासाठी प्रार्थनाही केली आहे.
Deeply distressed by the devastation and loss of hundreds of precious lives in Kerala due to nature’s fury in the last few days.
— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) August 4, 2024
My heart goes out to the victims of the Wayanad tragedy. Charan and I together are contributing Rs 1 Crore to the Kerala CM Relief Fund as a token of…
सध्या सोशल मीडियावर वायनाड येथील अनेक हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या घटनेने सगळीकडे हाहाकार माजला आहे. त्यामुळे अनेक जण घरातून बेघर झाले आहेत. भूस्खलनामुळे मोठे नुकसान झालं आहे. इस्रोने सॅटेलाईट फोटो घेऊन केरळमधील १३ फुटबॉल स्टेडियम मैदानाइतके क्षेत्र उद्ध्वस्त झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता. वायनाडमध्ये इंडियन आर्मीकडून सातत्याने बचावकार्य सुरू आहे.
अल्लू अर्जूनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 'पुष्पा २' यंदा ६ डिसेंबरला रिलीज होणार आहे. रश्मिका मंदान्ना या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा मोस्ट अवेटेड सिनेमांच्या लिस्टमध्ये टॉपवर आहे. तो पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग डिसेंबर २०२१ मध्ये प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडले होते.