'लेडी सुपरस्टार'च्या विरोधात धनुष थेट हायकोर्टात, 'नयनतारा' डॉक्युमेंटरीवरुन सुरु आहे वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 06:05 PM2024-11-27T18:05:03+5:302024-11-27T18:07:15+5:30

नेमकं प्रकरण काय? दोन सुपरस्टार्समध्ये कशावरुन सुरु आहे वाद

dhanush goes in high court against nayanthara regarding her documentary case | 'लेडी सुपरस्टार'च्या विरोधात धनुष थेट हायकोर्टात, 'नयनतारा' डॉक्युमेंटरीवरुन सुरु आहे वाद

'लेडी सुपरस्टार'च्या विरोधात धनुष थेट हायकोर्टात, 'नयनतारा' डॉक्युमेंटरीवरुन सुरु आहे वाद

साऊथ सुपरस्टार धनुष (Dhanush) आणि लेडी सुपरस्टार नयनतारा (Nayanthara) यांच्यातील वाद वाढतच चालला आहे. 'नयनतारा:बियॉन्ड द फेअरी टेल' या डॉक्युमेंटरीमधील ३ सेकंदाच्या व्हिडिओवरुन हा वाद आहे. हा व्हिडिओ नयनताराने अद्याप हटवला नसल्याने धनुषने आता थेट हायकोर्टाची पायरी चढली आहे. त्याने नयनताराला व्हिडिओ काढण्याचा अल्टिमेटम दिला होता मात्र त्यावर तिने काहीच कारवाई केली नसल्याने धनुष हायकोर्टात पोहोचला आहे.

'नयनतारा: बियॉन्ड द फेअरी टेल' या नुकत्याच रिलीज झालेल्या डॉक्युमेंटरीत ३ सेकंदाचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ २०१५ साली आलेल्या 'नानुम राऊडी धान' या सिनेमातला आहे. हा सिनेमा धनुषने निर्मित केला होता. तर नयनताराने यामध्ये काम केलं होतं. शिवाय याचं दिग्दर्शन नयनताराचा नवरा विग्नेश सिवनने केलं होतं. याच सिनेमाच्या सेटवर नयनतारा आणि विग्नेशची लव्हस्टोरी सुरु झाली होती. दरम्यान हा व्हिडिओ वावरण्यासाठी नयनताराने धनुषची परवानगी मागितली होती. मात्र त्याने ती दिली नव्हती. यानंतर नयनताराने तिच्याकडचाच ३ सेकंदाचा व्हिडिओ वापरला. मात्र त्यावरही धनुषने आक्षेप घेतला. यानंतर नयनताराने सोशल मीडियावरच थेट पोस्ट करत धनुषला सुनावलं होतं. तरी धनुषने आता मद्रास हायकोर्टात केस दाखल केली आहे. 

धनुषच्या टीमने नयनताराच्या विरोधात १० कोटींची नोटीस पाठवली आहे. व्हिडिओची परवानगी नसताना तो वापरल्याचा दावा धनुषने केला आहे. यासोबतच त्याने नेटफ्लिक्सशी जोडलेली ईकाई लॉस गैटॉस प्रोडक्शन सर्विसेस इंडिया एलएलपीलाही कोर्टाची परवानगी घेण्यास सांगितलं आहे.

Web Title: dhanush goes in high court against nayanthara regarding her documentary case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.