"ऑडिशनसाठी बोलावलं अन् कपडे..."; चित्रपट निर्माता रणजीत यांच्याविरोधात आणखी एक FIR, करण्यात आले गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 12:42 PM2024-08-31T12:42:41+5:302024-08-31T12:43:36+5:30

...यात अनेक तरुण कलाकार, बडे दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेत्यांकडून आपल्या सोबत झालेल्या गैरवर्तनासंदर्भात उघडपणे भाष्य करत आहेत.

mollywood metoo kerala police registered a case against filmmaker ranjith on the basis of the complaint lodged by an actor | "ऑडिशनसाठी बोलावलं अन् कपडे..."; चित्रपट निर्माता रणजीत यांच्याविरोधात आणखी एक FIR, करण्यात आले गंभीर आरोप 

"ऑडिशनसाठी बोलावलं अन् कपडे..."; चित्रपट निर्माता रणजीत यांच्याविरोधात आणखी एक FIR, करण्यात आले गंभीर आरोप 

मल्याळम चित्रपट सृष्टीत सुरू झालेल्या #MeToo मोहिमेने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली आहे. यात अनेक तरुण कलाकार, बडे दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेत्यांकडून आपल्या सोबत झालेल्या गैरवर्तनासंदर्भात उघडपणे भाष्य करत आहेत. चित्रपट दिग्दर्शक रणजीत यांच्यावरही आता लैंगिक गैरवर्तनाचे गंभीर आरोप झाले आहेत. यासंदर्बात तक्रार मिळाल्यानंतर, पोलिसांनी त्यांच्याविरोधात दोन वेगवेगळे गुन्हेही दाखल केले आहेत.

आता ताजी तक्रार एका तरुण अभिनेत्याने नोंदवली आहे. कोची पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, त्याला ऑडिशनच्या बहाण्याने बेंगळुरूमधील एका हॉटेलमध्ये बोलावण्यात आले. तेथे रणजीत यांनी त्याला कपडे काढण्यास भाग पाडले आणि मारहाण केली. मात्र त्यावेळी त्याला वाटले की, हा ऑडिशनच्या प्रक्रियेचा भाग आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला पैसेही देण्यात आले. रंजीत यांच्याविरोधातील लैंगिक आरोपाचे हे दुसरे प्रकरण आहे. 

यापूर्वी एका बंगाली अभिनेत्यानेही लैंगिक शोषणाचे आरोप करत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. यात, कोची येथील एका हॉटेलमध्ये आपल्यासोबत मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.

रंजीत यांनी आरोप फेटाळले - 
रंजीत यांनी आरोप फेटाळत, मित्राला 'पलेरी मणिक्यम' चित्रपटाच्या ऑडिशनसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, आपरण ठरवले की तो या भूमिकेसाठी योग्य नाही आणि त्याला परत पाठवले, असे म्हटले आहे.

राज्य सरकारकडून सात सदस्यीय तपास पथकाची स्थापना -
सरकारवर वाढत असलेल्या दबावानंतर, आता मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी रविवारी हेमा समितीचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सात सदस्यीय विशेष तपास पथकाच्या स्थापनेची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांकडून विजयन सरकारवर होत असलेले हल्ला पाहता, रंजीत यांनी केरळ राज्य चित्रपट अकादमीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
 

Web Title: mollywood metoo kerala police registered a case against filmmaker ranjith on the basis of the complaint lodged by an actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.