Wayanad Landslide : वायनाड भूस्खलन दुर्घटनेतील मृतांची संख्या १५० वर , रश्मिका झाली अस्वस्थ, पोस्ट शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 01:57 PM2024-07-31T13:57:03+5:302024-07-31T13:58:54+5:30

रश्मिका मंदानाने इन्स्टाग्रामवर वायनाड भूस्खलन दुर्घटनेवर पोस्ट शेअर केली आहे.

Wayanad landslide Rashmika Mandanna express sadness over deadly floods causing lives | Wayanad Landslide : वायनाड भूस्खलन दुर्घटनेतील मृतांची संख्या १५० वर , रश्मिका झाली अस्वस्थ, पोस्ट शेअर करत म्हणाली...

Wayanad Landslide : वायनाड भूस्खलन दुर्घटनेतील मृतांची संख्या १५० वर , रश्मिका झाली अस्वस्थ, पोस्ट शेअर करत म्हणाली...

केरळमधील वायनाडमध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. या घटनेत आतापर्यंत १५६ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून अनेकजण बेपत्ता आहेत. अजुनही या ठिकाणी मदत मोहिम सुरूच असून जखमींना रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आलं आहे. या दुर्घटनेवर फक्त सर्वसामान्य नागरिकच नाही तर कलाकार देखील यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. अभिनेत्री रश्मिका मंदानाने (Rashmika Mandanna) दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबाप्रती सहानुभूती दाखवली आहे. 

रश्मिका मंदानाने इन्स्टाग्रामवर वायनाडभूस्खलन (Wayanad landslide) दुर्घटनेवर पोस्ट शेअर केली आहे. रश्मिकाने लिहलं, ही घटना पाहून माझं हृदय तुटलं, मला माफ करा... हे खरचं खूप भयंकर आहे. कुटुंबाप्रती माझ्या संवेदना व्यक्त करते', अशा शब्दात रश्मिका मंदाना हिनं दु:ख व्यक्त केलं आहे.

केरळमधील वायनाड जिल्ह्यातील मेप्पडीजवळ मंगळवारी मुसळधार पावसामुळे भूस्खलन झालं. याआधी सोमवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत होता.  झोपेत असतानाच गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मातीचे ढिगारे वाहून आल्याने काही कळायच्या आत गावकरी त्याखाली गाडले आहेत. तसेच पाण्याचा प्रवाह इतका होता की अनेकजण त्यात वाहून गेले आहेत. 

भारतीय हवामान खात्याने केरळच्या सर्व उत्तरेकडील जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. येत्या २४ तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. भूस्खलनग्रस्त वायनाड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे बचावकार्यावर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. पुढील वीस तासांत या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढील सात दिवस राज्यभर अधूनमधून मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे.
 

Web Title: Wayanad landslide Rashmika Mandanna express sadness over deadly floods causing lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.