"शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं", दादांचा स्टार प्रचारक भाऊ कदम यांची इच्छा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 02:06 PM2024-11-06T14:06:50+5:302024-11-06T14:09:15+5:30

अभिनेते भाऊ कदम यांनी अजित पवारांचे तोंडभरुन कौतुक केलं. 

Star Campaigner Of Ncp Ajit Pawar Bhau Kadam Says Ajit Pawar And Sharad Pawar Should Unite | Vidhan Sabha Election 2024 | "शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं", दादांचा स्टार प्रचारक भाऊ कदम यांची इच्छा, म्हणाले...

"शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावं", दादांचा स्टार प्रचारक भाऊ कदम यांची इच्छा, म्हणाले...

Bhau kadam On Ajit Pawar  : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. सत्ता काबीज करण्यासाठी महायुतीनं कंबर कसली. निवडणुकीच्या प्रचारासाठी सिने क्षेत्रातील कलाकारांना पाचारण केलं जात आहे. अभिनेते सजायी शिंदे यांच्यानंतर आता 'चला हवा येऊ द्या' फेम भाऊ कदम हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे अधिकृत स्टार प्रचारक (Star Campaigner Of Ncp Ajit Pawar) असणार आहेत. नुकतंच एका मुलाखतीमध्ये भाऊ कदम यांनी अजित पवारांचे तोंडभरुन कौतुक केलं. 

भाऊ कदम हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करताना दिसणार आहे. एबीपी वाहिनीशी बोलताना भाऊ कदम यांनी अजित पवार आणि शरद पवार  (Ajit Pawar-Sharad Pawar) यांनी एकत्र यावे, अशी इच्छा व्यक्त केली. भाऊ म्हणाले, "ते एकत्र यावेत आणि सगळे छान व्हावे, असे मला मनापासून वाटते". एवढंच काय तर अजित पवारांनी मुख्यमंत्री झाल्यास आनंद होईल, असेही ते म्हणाले. 

भाऊ कदम म्हणाले, "अजित पवार हे आम्हा कलाकारांना मान देणारे, अनेक प्रश्न सोडवणारे आहेत. आता नुकतेच त्यांनी अनुदानाचा प्रश्न सोडवला. मला असं वाटलं की कुठेतरी आमच्या कलाकारांच्या गोष्टी, मागण्या पुर्णत्वास न्यायच्या असतील तर त्यांना बोलून एक मार्ग मिळेल. ते चांगले मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रचाराला जाण्यास काहीच हरकत नाही. मी केवळ स्टार प्रचारक म्हणून पाहायला मिळेल. अजून पक्ष प्रवेश केलेला नाही". 

प्रचार करण्यासाठी अजित पवार यांचीच निवड का केली, या प्रश्नावर उत्तर देताना भाऊ कदम म्हणाले, "एकच वादा अजित दादा. त्यांची काम करण्याची पद्धत अफलातून आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते सतत काम करत असतात. असाच नेता हवा, जो जनतेकडे लक्ष ठेवून आहे. ते आपल्या महाराष्ट्राला पुढे नेतील, अशी आशा मला वाटते. म्हणून अजित दादा". 

Web Title: Star Campaigner Of Ncp Ajit Pawar Bhau Kadam Says Ajit Pawar And Sharad Pawar Should Unite | Vidhan Sabha Election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.