स्वरा भास्कर म्हणाली, शाब्बास राहुल गांधी...! शेअर केला व्हिडीओ

By रूपाली मुधोळकर | Published: October 2, 2020 01:21 PM2020-10-02T13:21:31+5:302020-10-02T13:22:09+5:30

स्वराने राहुल गांधी यांच्या आंदोलनाचा व्हिडीओ पोस्ट करत, एक ट्वीट केले.

swara bhasker reaction on rahul gandhi stopped by up police at yamuna expressway | स्वरा भास्कर म्हणाली, शाब्बास राहुल गांधी...! शेअर केला व्हिडीओ

स्वरा भास्कर म्हणाली, शाब्बास राहुल गांधी...! शेअर केला व्हिडीओ

googlenewsNext
ठळक मुद्देबलात्कार पीडित दलित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राहुल व प्रियांका गांधी गुरुवारी सकाळी दिल्लीहून हाथरसला जायला निघाले होते.

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात दलित मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पीडितेच्या कुुटुंबीयांची भेट घेण्यासाठी चाललेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व त्या पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना पोलिसांनी यमुना एक्स्प्रेस वेवर अडवून ताब्यात घेतले व काही वेळानंतर त्यांना पुन्हा दिल्लीला पाठवून दिले. राहुल गांधी यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्यांना ढकलून देण्यात आले. यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या विरोधात महामारी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या कारवाईवर बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने संताप व्यक्त केला आहे.
स्वराने राहुल गांधी यांच्या आंदोलनाचा व्हिडीओ पोस्ट करत, एक  ट्वीट केले. ‘शाब्बास राहुल गांधी... संकल्प’! , असे लिहित तिने राहुल यांचे कौतुक केले.

यूपी पोलिसांनी थांबवला काँग्रेसचा ताफा, कारण...जमावबंदी, लॉकडाऊन

बलात्कार पीडित दलित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राहुल व प्रियांका गांधी गुरुवारी सकाळी दिल्लीहून हाथरसला जायला निघाले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत हजारो काँग्रेस कार्यकर्ते होते.त्यांचा ताफा यमुना एक्स्प्रेस वेवर उत्तर प्रदेश पोलिसांनी अडविला. ते पाहून काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले होते.
हाथरसमध्ये जमावबंदी आदेश (कलम १४४) लागू असल्याने तिथे इतक्या लोकांना जाता येणार नाही असे पोलिसांनी सांगताच मला एकट्याने तिथे जाऊ द्या असा राहुल गांधी यांनी धरलेला आग्रही मान्य करण्यात आला नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी केलेल्या लाठीमाराचे राहुल गांधींनाही तडाखे बसले व ते खाली पडले. त्यांना जखम झाली असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. प्रियांका व राहुल गांधी यांना ताब्यात घेऊन उत्तर प्रदेश पोलिसांनी यमुना एक्स्प्रेस वेवरील एका गेस्ट हाऊसमध्ये नेले. तिथून त्यांना पुन्हा दिल्लीच्या दिशेने रवाना करण्यात आले.

Hathras Gangrape : यमुना एक्स्प्रेस वेवर प्रियंका आणि राहुल गांधींना पोलिसांनी अडवलं, पायी हाथरसकडे रवाना

राहुल गांधींना उत्तर प्रदेशमध्ये अटक; पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप 

Read in English

Web Title: swara bhasker reaction on rahul gandhi stopped by up police at yamuna expressway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.