अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्नीला पाहिलंत का?, एखाद्या अभिनेत्री इतकीच आहे सुंदर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 06:06 PM2021-09-18T18:06:27+5:302021-09-18T18:07:02+5:30
डॉ. अमोल कोल्हे हे अभिनेते असण्यासोबतच खासदार देखील आहेत.
स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. डॉ. अमोल कोल्हे हे अभिनेते असण्यासोबतच खासदार देखील आहेत. शिरुर मतदारसंघातून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. अमोल कोल्हे आज ४१वा वाढदिवस साजरा करत आहेत. फार कमी लोकांना त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल माहित आहे. त्यांची पत्नी अश्विनी कोल्हे यादेखील डॉक्टर आहेत.
अभिनेते डॉ. अमोल कोल्हे हे गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत असले तरी त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले आहे. त्यांच्या पत्नी अश्विनी कोल्हे या देखील डॉक्टर आहेत.
डॉ. अश्विनी अमोल कोल्हे सध्या मुंबईतील केईएम रुग्णालयात कार्यरत आहेत. त्या २००९ पासून या रुग्णालयात रुग्णांची सेवा करत आहेत.
२००७ साली त्यांनी अश्विनी यांच्यासोबत लग्न केले. डॉ. अमोल कोल्हे आणि डॉ. अश्विनी कोल्हे यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलीचे नाव आद्या आहे तर मुलाचे नाव रुद्र. आद्याने स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. तिने स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या ताराची भूमिका साकारली आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला 'राजा शिव छत्रपती' या मालिकेत काम केले होते. त्यांना या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.
त्यांनी अरे आवाज कुणाचा, ऑन ड्युटी २४ तास, राम माधव, राजमाता जिजाऊ, मराठी टायगर्स यांसारख्या चित्रपटांमध्ये तसेच अनेक मालिकांमध्ये, नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका केल्या आहेत.