Ganesh festival 2018 : कलाकारांचा बाप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 01:58 PM2018-09-13T13:58:06+5:302018-09-13T14:03:36+5:30

श्रीगजाननाच्या आगमनाचे वेध सगळ्यांनाच लागले आहेत. बाप्पाचे भक्त असलेल्या अनेक मराठी कलाकारांच्या घरीही गणरायाचं आगमन होतं. त्यातल्याच काही सेलिब्रिटींनी बाप्पाच्या आठवणी शेअर केल्या

 Ganesh Festival 2018: Celerities Bappa | Ganesh festival 2018 : कलाकारांचा बाप्पा

Ganesh festival 2018 : कलाकारांचा बाप्पा

googlenewsNext

गणेशोत्सवातले पाच दिवस मी घरी असतो. माझ्या घरी ५ दिवस गणपती असतात. घरी मित्रमंडळी येतात, नातेवाईक असतात. माझ्या घरी गणेशाची मूर्ती आणिडेकोरेशन हे दोन्ही इकोफ्रेंडली असतं. मी खूप आतुरतेने या सणाची आणि बाप्पाची वाट बघतो. हा पाहुणा घरी आला कि सर्व घरातील वातावरण मंगलमय होतं. लहानपणी गणेशोत्सव म्हणजे आम्हा लहान मुलांची खूप धमाल मस्ती असायची. घरी आणि बिल्डिंगमधील सार्वजनिक गणपती असा दुहेरी उत्सव असायचा. बिल्डिंगमध्ये आम्ही क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमात हिरीरीने भाग घ्यायचो, आरतीसाठी सर्वात आधी हजेरी लावायचो. या सगळ्यात ५ दिवस कसे निघून जायचे हेकळायचेच नाही. माझ्या घरच्या गणपतीचं विसर्जन झाल्यावर आम्ही सार्वजनिक गणपतीचं विरसर्जन करायचो. बाप्पाचं विसर्जन करताना डोळ्याच्या कडा ओलावतातपण तितक्याच आनंदात आम्ही बाप्पाला निरोप द्यायचो. या सर्व आठवणी अजूनही तितक्याच ताज्या आहेत. यंदा विशेष म्हणजे आमच्या घरच्या गणपतीला ३६ वर्षंपूर्ण होत आहेत. गणेशोत्सव हा सण म्हणून साजरा करायला मला आवडतो. नाहीतर बरेच लोक सुट्टी मिळाली म्हणून फिरायला जातात. मला असं वाटतं येणाऱ्या पिढीनेदेखील या सणाकडे सुट्टी म्हणून नाही तर एक सण म्हणून बघावं आणि तितक्याच आपुलकीने तो साजरा पण करावा.

 

- हार्दिक जोशी, अभिनेता

आमच्या घरी दीड दिवस गणपती असतात. या निमित्तानं सर्व भावंडं आणि नातेवाईक घरी जमतात. त्या दोन दिवसांमध्ये सगळेजण आपापली कामं बाजूला ठेवतात. सगळ्यांचीच भेट होते. आमच्या घरी लालबागच्या राजाची प्रतिकृती असलेली गणेशमूर्ती आणली जाते. गणेशात्सवातली खास गोष्ट म्हणजे माझा जन्मगणेशोत्सवादरम्यानचाच असल्यानं जवळपास प्रत्येक वर्षीचा गणेशोत्सव माझ्यासाठी खास असतो.

- हृता दुर्गुळे, अभिनेत्री

Web Title:  Ganesh Festival 2018: Celerities Bappa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.