The Kerala Story: भारतात धुमाकूळ घातल्यानंतर आता ‘द केरळ स्टोरी’ 37 देशांमध्ये रिलीज होणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 04:41 PM2023-05-10T16:41:07+5:302023-05-10T16:42:08+5:30

The Kerala Story: चित्रपटातील अभिनेत्री अदाह शर्मा हिने सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली.

The Kerala Story: After making waves in India, now 'The Kerala Story' will be released in 37 countries | The Kerala Story: भारतात धुमाकूळ घातल्यानंतर आता ‘द केरळ स्टोरी’ 37 देशांमध्ये रिलीज होणार...

The Kerala Story: भारतात धुमाकूळ घातल्यानंतर आता ‘द केरळ स्टोरी’ 37 देशांमध्ये रिलीज होणार...

googlenewsNext

The Kerala Story: गेल्या काही दिवसांपासून वादात अडकलेला 'द केरळ स्टोरी'(The Kerala Story) चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. सुदीप्तो सेन दिग्दर्शित या चित्रपटावर भारतात बंदी घालण्याची मागणी होत असताना, आता हा चित्रपट 37 देशांमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या अदाह शर्मा (Adah Sharma) हिनेच ही माहिती दिली आहे.

चित्रपटाचा ट्रेल आल्यानंतर अनेकांकडून या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत होती. पण, सेन्सॉर बोर्डाने चित्रपट पास केल्यानंतर चित्रपट प्रदर्शित झाला अन् प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. पण, तामिळनाडूसह पश्चिम बंगालमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. तरीदेखील या चित्रपटाने पाच दिवसांत 55 कोटींचा गल्ला जमवला आहे. आता हा चित्रपट परदेशातही प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी द केरळ स्टोरी इतर देशांमध्येही प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा चित्रपट आणखी 37 देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे, ज्याची माहिती स्वतः चित्रपटाची अभिनेत्री अदा शर्मा हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली आहे. ती म्हणाली, जे लोक चित्रपट पाहणार आहेत त्यांचे आभार. हा ट्रेंड बनवल्याबद्दल धन्यवाद. आता आमचा चित्रपट या वीकेंडला 12 मे रोजी आणखी 37 देशांमध्ये रिलीज होणार आहे. 
 

Web Title: The Kerala Story: After making waves in India, now 'The Kerala Story' will be released in 37 countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.