राहुल गांधी यांचे वर्तन उतावीळ विद्यार्थ्यासारखे- बराक ओबामा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2020 01:03 AM2020-11-14T01:03:58+5:302020-11-14T07:01:49+5:30
आठवणीपर पुस्तकातील निरीक्षण
वॉशिंग्टन : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे वर्तन शिक्षकावर छाप पाडण्यासाठी उतावीळ; पण आपल्या विषयावर प्रावीण्य मिळविण्याची अजिबात इच्छा नसलेल्या किंवा ती योग्यता नसलेल्या विद्यार्थ्याप्रमाणे आहे, असे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे.ओबामा यांनी ‘ए प्रॉमिस्ड लँड’ या पुस्तकामध्ये आपल्या राजकीय व सामाजिक जीवनातील आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावरील आठ वर्षांच्या काळात ओबामा यांना जे अनुभव आले त्याचे चित्रणही या पुस्तकात आहे. राहुल गांधी हे मला निराश वाटले असे निरीक्षण नोंदवून बराक ओबामा यांनी म्हटले आहे की, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग हे आदरणीय व अतिशय प्रामाणिक गृहस्थ आहेत.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबद्दलच्या काही आठवणींचा उल्लेख ओबामांनी आपल्या नव्या पुस्तकात केला आहे. ओबामा यांचे पुस्तक येत्या मंगळवारी प्रसिद्ध होणार आहे. (वृत्तसंस्था)