देशाच्या राजकारणात कसा होईल बदल, राहुल गांधींनी केंब्रिजमध्ये सांगितलं आपलं व्हिजन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 09:18 AM2022-05-24T09:18:39+5:302022-05-24T09:20:23+5:30

राहुल गांधी सोमवारी केंब्रिज विद्यापीठाच्या कॉर्पस ख्रिस्ती कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी पोहोचले होते.

How will the politics of the country change, Rahul Gandhi stated his vision in Cambridge | देशाच्या राजकारणात कसा होईल बदल, राहुल गांधींनी केंब्रिजमध्ये सांगितलं आपलं व्हिजन

देशाच्या राजकारणात कसा होईल बदल, राहुल गांधींनी केंब्रिजमध्ये सांगितलं आपलं व्हिजन

Next

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी लंडनमधील केंब्रिज विद्यापीठातील कॉर्पस ख्रिस्ती कॉलेजमधील (Corpus Christi College in Cambridge University) विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यादरम्यान राहुल गांधी यांनी भारताला राष्ट्र (राज्यांचा महासंघ) म्हणण्याचे आव्हान दिले. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारताची तुलना युरोपशी केली. फरक एवढाच की तो केंद्रशासित प्रदेश नाही, असं ते म्हणाले.

केंब्रिज विद्यापीठातील कॉर्पस ख्रिस्ती कॉलेजमधील इतिहासाच्या असोसिएट्स प्रोफेसर आणि फेलो डॉ. श्रुती कपिला यांच्याशी राहुल गांधी यांनी संवाद साधला. यादरम्यान, भारतातील सद्य परिस्थितीबद्दलही त्यांनी भाष्य केलं. “राजकारण आणि धोरणात बदल करण्यासाठी आपल्या पक्षात तरुणांना दरवाजे खुले करत आहोत. तरुणांना एकत्रित करण्याचा काँग्रेस प्रयत्न करत आहे, जेणेकरून त्यांना आपला आवाज उठवता येईल. महात्मा गांधींची राजकारणाची शैली ही काळाची गरज आहे,” असंही ते म्हणाले.

“ऑगस्टमध्ये पक्षात निवडणुका होणार आहेत. पक्षाचा नवा अध्यक्ष कोण असेल ते त्यात ठरेल,” असंही ते म्हणाले. चर्चेदरम्यान राहुल गांधी यांना त्यांचे वडील राजीव गांधी यांच्या निधनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. याचं उत्तर देताना ते भावूक झआले. माझ्या जीवनातील सर्वात मोठा शिकलेला अनुभव हा माझ्या वडिलांचा मृत्यू होता, असंही ते म्हणाले. 

बेरोजगारीवरून निशाणा
दरम्यान, बेरोजगारीच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी केंद्र सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे. देशातील बेरोजगारीने विक्रम मोडले आहेत. खेडेगावात तसेच शहरांमध्ये बेरोजगारीने कहर केला आहे. एवढेच नाही तर राजस्थानच्या काँग्रेस सरकारने 'इंदिरा गांधी शहरी रोजगार हमी योजना' आणण्याचा निर्णय घेतल्याचे राहुल गांधी यांनी जाहीर केले.

देशात बेरोजगारीने विक्रम मोडले आहेत. खेडेगावात तसेच शहरांमध्ये बेरोजगारीने कहर केला आहे. ४५ कोटींहून अधिक लोकांनी नोकरी मिळण्याची आशा सोडली आहे. २००५ मध्ये काँग्रेस पक्षाने मनरेगा आणली. यामध्ये किमान १०० दिवस कामाची हमी देऊन बेरोजगारीच्या समस्येवर मात करण्यात आल्याचंही त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केलं. राजस्थानच्या काँग्रेस सरकारनं ‘इंदिरा गांधी शहरी रोजगार हमी योजना’ आणली आहे. या योजनेअंतर्गत गरजू कुटुंबांना १०० दिवसांची रोजगार हमी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Web Title: How will the politics of the country change, Rahul Gandhi stated his vision in Cambridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.