राहुल गांधी स्वतःची यातायात करून घेत आहेत; नारायण राणेंचा टोला

By अनिकेत घमंडी | Published: November 18, 2022 05:52 PM2022-11-18T17:52:46+5:302022-11-18T17:53:17+5:30

आघाडीच्या पक्ष नेत्यांची मन जुळली नाहीत; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली जगभरात भारताचे नाव 

Rahul Gandhi is walking himself; Narayan Rane's dig on Congress Bharat Jodo Yatra | राहुल गांधी स्वतःची यातायात करून घेत आहेत; नारायण राणेंचा टोला

राहुल गांधी स्वतःची यातायात करून घेत आहेत; नारायण राणेंचा टोला

Next

 डोंबिवली: एवढी वर्षे काँग्रेस केंद्रात सत्तेत होती, त्यावेळी त्याना भारत जोङोचा उपक्रम सुचला नाही, जमला नाही. आता ते स्वतःची यातायात करून घेत असून त्यांनी गुरुवारी सावरकरांबद्दल जे वक्तव्य केले त्याचा भाजपने आधीच निषेध।केला आहे, त्यामुळे त्यावर अधिक।भाष्य काय करणार? असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले. येथील।खासगी हॉस्पिटलच्या शुभारंभप्रसंगी ते डोंबिवलीत आले असताना माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

गांधींच्या यात्रेत तीच तीच लोक यात्रेत असून नवे कोणीही सहभागी होत नसल्याचे ते म्हणाले. भाजप केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली जगाला हेवा वाटावा असे कार्य करत आहे, मोदींचे तर आता सर्व जगभर कौतुक होत असून सामर्थ्यशाली असे ते नेते आहेत. त्यामुळे या यात्रेचा फारसा प्रभाव।निर्माण होऊ शकलेला नाही अशी टीका त्यांनी।केली. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित।होते. राणे पुढे म्हणाले।की, माजी मंत्री आदित्य ठाकरे हा बालिश असून त्याच्या वक्तव्यावर काय बोलावे, उद्धव ठाकरे यांनीही सावरकरांसंदर्भात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका काय होती हे समजून घ्यायला हवे. सावरकरांसारखे व्यक्तिमत्त्व बाळासाहेबांचे आवडते होते, पण आता या दोघांना काय बोलणार असे राणे म्हणाले.

फोटोसाठी ते गांधींना सपोर्ट करत असून गांधी यांची भारत जोडो यात्रा नावाला असून या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिन्ही पक्षांची मन, मत जुळलेली नाहीत त्याचे काय करावे? असा खोचक सवाल त्यांनी।केला. बदला घेण्याचे राजकारण सध्या सुरू आहे का असा सवाल केल्यावर राणे म्हणाले की, कोणी केले असे राजकारण हे ज्याचे त्याने पहावे म्हणजे उत्तर मिळतील. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग कामाच्या संथ गतीबद्दल देखिल ते म्हणाले की, या शहराचे आमदार रवींद्र चव्हाण हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री असून ठेकेदार संदर्भात तांत्रिक अडचणी असून त्या सुटल्या असून लवकरच तो रस्ता तयार होईल, आता कामाला वेग येत असल्याचे ते म्हणाले.
 

Web Title: Rahul Gandhi is walking himself; Narayan Rane's dig on Congress Bharat Jodo Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.