भारत जोडो... कोल्हापुरातील ऋषिकेशच्या पेटिंगचे राहूल गांधींना अप्रूप
By विश्वास पाटील | Published: November 12, 2022 09:45 PM2022-11-12T21:45:31+5:302022-11-12T21:46:34+5:30
ब्राम्ही लिपीत लेखन : यात्रा म्हणजेच शांती, अहिंसेचा मार्ग
(विश्वास पाटील)
कोल्हापूर : कोल्हापूरच्या ऋषिकेश घोरपडे याने अशोकन ब्राह्मी लिपी मध्ये "भारत जोडो यात्रा एडिक्ट" ही कॅलिग्राफी करून राहुल गांधी यांना भेट दिलेल्या पेटिंगचे त्यांनाही चांगलेच अप्रूप वाटले. ऋषिकेश हा राजाराम चौकातील सहकार खात्यातील निवृत्त अधिकारी प्रदिप घोरपडे यांचा मुलगा आहे.
हिंगोली येथे भारत जोडो यात्रा आली असता ऋषिकेश यांनी तेथे गर्दीतून त्याने केलेले कॅलिग्राफी पेंटिंग उंचावून दाखवले. त्यांनी बोलवून घेवून ते पेंटिंग काय आहे हे आस्थेने जाणून घेतले.
ज्या प्रमाणे सम्राट अशोक याने त्याच्या शिलालेखात शांती, अहिंसा, बंधुभाव यांचा संदेश दिला त्याचप्रमाणे भारत जोडो यात्राही शांती, अहिंसा, बंधुभाव यांचा संदेश देत आहे. त्यामुळे "अशोकाचे शिलालेख" ज्या ब्राह्मी लिपीत आहेत त्याच ब्राह्मी लिपीत "भारत जोडो यात्रा एडिक्ट" ऋषिकेश यांनी तयार केला. या कॅलिग्राफी पेंटिंगमध्ये ब्राह्मी लिपीत यात्रेचा मार्ग दाखवला आहे. अशोक चक्र काढले आहे. त्यांना ही संकल्पना आणि पेंटिग खूप आवडले. फेसबूकवरही त्यांनी त्याबध्दलच्या भावना शेअर केल्या आहेत. ऋषिकेश यांने वेगवेगळ्या ५६ लिपीमध्ये भारत", "राहुल", "सोनिया", "राजीव", "गांधी". ही नावे देखील लिहून भेट दिली.