MLA P. N. Patil passed away: राहुल गांधी यांनी पत्र पाठवून केले पाटील कुटूंबियांचे सांत्वन
By राजाराम लोंढे | Published: May 28, 2024 06:07 PM2024-05-28T18:07:16+5:302024-05-28T18:07:40+5:30
सद्भावना दौडचाही केला उल्लेख
कोल्हापूर : काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांनी पत्र पाठवून दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या कुटूंबियांचे सांत्वन केले. आमदार पाटील यांच्या जाण्याने काँग्रेस पक्ष निष्ठावंत नेत्याला मुकल्याची भावना त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.
आमदार पाटील यांच्या निधनानंतर राज्य पातळीवरील विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक्ष भेटून पाटील कुटूंबियांचे सात्वन केले. आमदार पाटील हे काँग्रेसचे निष्ठावंत होते, त्याची जाणीव पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वालाही होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी पत्र पाठवून सात्वन केले. आमदार पाटील यांनी त्यांचे आयुष्य सामान्य माणसासाठी वाहून घेतले हाेते, त्यांनी काँग्रेसचे विचारधारा तळागाळापर्यंत पोहचवण्याचे काम प्रामाणिकपणे केल्यानेच कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढली. अशा नेतृत्वाला आम्ही मुकलो असून गांधी परिवार अखंडपणे पाटील परिवारासोबत कायम राहील. असे राहुल गांधी यांनी राहुल पाटील यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
सद्भावना दौडचाही केला उल्लेख
दिवंगत आमदार पाटील हे अखंडीतपणे २० ऑगस्टला राजीव गांधी जयंती निमित्त सौदभावना दौड काढत होते. त्याचा उल्लेखही राहुल गांधी यांनी पत्रात केला आहे.