भारत जोडो नव्हे तर.., भाजप प्रवक्त्या शायना एनसी यांची काँग्रेसवर टीका

By भीमगोंड देसाई | Published: October 29, 2022 04:20 PM2022-10-29T16:20:54+5:302022-10-29T16:52:44+5:30

महाराष्ट्रातील उद्योग, व्यवसाय गुजरातला पळवले जात असल्याच्या आरोपावर शायना म्हणाल्या, उद्योगधंद्यांच्या गुंतवणुकीचा निर्णय उद्योजक घेत असतात. राजकीय नेते हे ठरवू शकत नाहीत.

Congress's journey not to join India, but to join the party, the family, Criticism of BJP spokesperson Shaina NC | भारत जोडो नव्हे तर.., भाजप प्रवक्त्या शायना एनसी यांची काँग्रेसवर टीका

भारत जोडो नव्हे तर.., भाजप प्रवक्त्या शायना एनसी यांची काँग्रेसवर टीका

googlenewsNext

कोल्हापूर : काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांची भारत जोडो नव्हे तर पक्ष, परिवार जोडो यात्रा आहे. मतदारांनाही हे चांगले माहीत आहे. म्हणून प्रत्येक निवडणुकीत भाजपलाच जनाधार मिळत असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. जायंटस ग्रुप ऑफ कोल्हापूरतर्फे आयोजित कार्यक्रमासाठी त्या आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसवर हल्लाबोल्ल चढवला.

शायना म्हणाल्या, काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. अशावेळी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा करण्यापेक्षा पक्ष वाचविण्यासाठी यात्रा काढावी. काँग्रेसकडे सक्षम विरोधी पक्ष होण्याचीही ताकद राहिलेली नाही. आता हा पक्ष प्रादेशिक बनत चालला आहे. भारत जोडो यात्रे़चे स्वागत शिवसेना, राष्ट्रवादी पक्षातर्फे महाराष्ट्रात करण्यात येणार आहे. मात्र महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी शिल्लक आहे कोठे?

गुजरातची जनता केजरीवालांना भुलणार नाही

गुजरात विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मतांचे राजकारण करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नोटांवर देवदेवतांचे फोटो छापण्याची मागणी करीत आहेत. मात्र यास गुजरातची जनता भुलणार नाही. भाजपचा अजेंडा हा सबका साथ सबका विकासचा आहे. येत्या महापालिका निवडणुकीत मुंबईत कोणाची ताकत आहे, हे शिवसेना ठाकरे गटालाही कळून चुकेल.

उद्योजक ठरवतात, नेते नव्हे

महाराष्ट्रातील उद्योग, व्यवसाय गुजरातला पळवले जात असल्याच्या आरोपावर शायना म्हणाल्या, उद्योगधंद्यांच्या गुंतवणुकीचा निर्णय उद्योजक घेत असतात. राजकीय नेत हे ठरवू शकत नाहीत. यामुळे महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला नेले या आरोपात काही तथ्य नाही.

..तेच लोक यंत्रणाच्या कारवाईसंबंधी चुकीचा संदेश पसरवत आहेत

ईडी आणि सीबीआय स्वतंत्र यंत्रणा आहेत. या संस्थांतर्फे चुकीचे काम केलेल्यांवर कारवाई होत आहे. ज्यांनी चुकीचे काम केले नाहीत, त्यांनी या यंत्रणांना घाबरण्याची गरज नाही. दाल मे कुछ काला है असेच लोक या यंत्रणाच्या कारवाईसंबंधी चुकीचा संदेश पसरवत आहेत, असेही शायना यांनी स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेला भाजपचे महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, जायंटसचे गिरीश चितळे आदी उपस्थित होते.

Web Title: Congress's journey not to join India, but to join the party, the family, Criticism of BJP spokesperson Shaina NC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.