कमलनाथच्या गडात 'कमळ' ची परीक्षा; 'मुख्यमंत्री' कार्ड व 'लाडली बहना' भोवती फिरतेय निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 07:23 AM2023-11-15T07:23:26+5:302023-11-15T07:23:32+5:30

भाजपने भाजपने शेवटच्या टप्यात कमलनाथ यांना छिंदवाड्याच गुंतवून ठेवण्याची रणणिती आखली आहे.

BJP has put its full strength to the test and is trying to leave an impression on women voters through the 'Ladli Behna' scheme. | कमलनाथच्या गडात 'कमळ' ची परीक्षा; 'मुख्यमंत्री' कार्ड व 'लाडली बहना' भोवती फिरतेय निवडणूक

कमलनाथच्या गडात 'कमळ' ची परीक्षा; 'मुख्यमंत्री' कार्ड व 'लाडली बहना' भोवती फिरतेय निवडणूक

- कमलेश वानखेडे

नागपूर : महाराष्ट्राच्या उत्तर सिमेला लागून असलेला छिंदवाडा जिल्हा काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा गढ़ मानला जातो. या जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळी काँग्रेसचा "पंजा उंचावला होता. यावेळी भाजपने आपली पूर्ण ताकद पणाला लावली असून 'लाडली बहना' योजनेच्या माध्यमातून महिला मतदारांवर छाप सोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर काँग्रेसने येथे कमलनाथ यांना 'मुख्यमंत्री' करण्याचे कार्ड खेळले आहे. एकूणच कमलनाथ यांच्या गडात 'कमळ' ची परीक्षाच होत आहे.

छिंदवाडा जिल्ह्यात पांढुर्णा, सौंसर, छिंदवाडा, चवराई, अमरवाडा, जुन्नारदेव, परासिया हे सात विधानसभा मतदारसंघ येतात. हे सातही मतदारसंघात गेल्यावेळी काँग्रेसने जिंकले होते. कमलनाथ यांचे पूत्र नकुलनाथ हे येथील खासदार आहेत. भाजपने भाजपने शेवटच्या टप्यात कमलनाथ यांना छिंदवाड्याच गुंतवून ठेवण्याची रणणिती आखली आहे.

उद्या, बुधवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तोफ छिंदवाड्यात तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ पिपळा नारायणवार (सौरस मतदारसंघ) येथे धडाडणार आहे. छिंदवाडा जिल्ह्यातील सातही मतदारसंघात कमलनाथ यांना मतदारांची भावनिक साथ मिळण्याची चिन्हे आहेत. गेल्यावेळी भाजपने आमदार फोडून सत्ता हिसकावली.

कमलनाथ यांना फक्त १५ महिनेच मुख्यमंत्रीपदी राहू दिले. यावेळी कमलनाथ यांना पूर्ण पाच वर्षे द्या, या प्रमुख भावनिक मुद्यावर काँग्रेसचा प्रचार सुरू आहे. तर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 'लाडली बहना' योजना लागू करीत ऐन निवडणुकीच्या तोंडावर महिलांच्या खात्यात १२५० रुपये जमा केले आहेत. या योजनेला तोड म्हणून कमलनाथ यांनीही 'नारी सन्मान योजनेची घोषणा करीत महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा करण्याची घोषणा केली आहे. या दोन योजनेमुळे महिला मतदार संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे.

सौंसर, पांढुर्णा व परासियात काँग्रेसचा कस लागणार

सौंसर, पांढुर्णा व परासिया या तीन मतदारसंघात काँग्रेससमोर भाजपने तगडे आव्हान उभे केले आहे. येथे अटीतटीचा सामना होईल, असा मतदारांचा प्राथमिक कॉल आहे. मतदारांनी उमेदवार पाहून मतदान केले तर भाजप बाजी मारेल व कमलनाथ यांना मुख्यमंत्री करण्याचा मुद्दा मतदारांना पटविण्यात यश आले तर काँग्रेस हात मारेल, असे येथील सध्याचे चित्र आहे.

मराठी पट्ट्यात नाती-गोती कामाला

पांदुर्णा व सौंसर या दोन मतदारसंघांत मराठी मतदारांचा पगडा आहे. कुणबी, तेली, माळी समाजाचा पगडा आहे. याशिवाय उर्वरित पाच मतदारसंघातही मराठी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे या भागात उमेदवारांचे नागपूर व विदर्भातील नातलग कामाला लागले आहेत.

महाराष्ट्रातील नेत्यांची प्रचारात

आघाडी छिंदवाडा जिल्ह्यातील सातही मतदारसंघांतील प्रचारात महाराष्ट्रातील नेते आघाडीवर आहेत. सौंसर, पांढुर्णा हा पूर्ण मराठी भाषिकांचा पट्टा असल्यामुळे येथे दोन्ही प्रमुख पक्षांनी नागपूर व विदर्भातील नेत्यांवर प्रचाराची जबाबदारी सोपवली आहे. कॉंग्रेसकडून माजी मंत्री सुनील केदार तळ ठोकून आहेत. माजी यशोमती ठाकूर, अनीस अहमद यांच्यासह आ. प्रणिती शिंदे, आ. अभिजित वंजारी, आ. धीरज लिंगाडे आदींनी प्रचार सभा घेतल्या. भाजपकडून आ. प्रवीण दटके, आ. आकाश फुंडकर, माजी आ. डॉ. परिणय फुके यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे.

Web Title: BJP has put its full strength to the test and is trying to leave an impression on women voters through the 'Ladli Behna' scheme.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.